शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
4
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
5
गुजरात पोलिसांची मोठी कावाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
6
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
7
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
8
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
9
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
10
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
11
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
12
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
13
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
14
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
15
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
16
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
17
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
18
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
19
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
20
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा

अकोला जिल्ह्यात ७३ कोटींची विकास कामे मार्गी लावण्याचे आव्हान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 15:55 IST

अकोला: जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत २०१८-१९ या वर्षात जिल्ह्यातील विविध विकास कामांसाठी मंजूर १३९ कोटी ५१ लाख रुपयांच्या निधीपैकी डिसेंबर अखेरपर्यंत केवळ ६६ कोटी ३९ लाख ८ हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात आला असून, उर्वरित ७३ कोटी ११ लाख ९२ हजार रुपयांची विकास कामे येत्या दोन महिन्यांत मार्गी लावण्याचे आव्हान संबंधित यंत्रणांसमोर उभे ठाकले आहे.

- संतोष येलकरअकोला: जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत २०१८-१९ या वर्षात जिल्ह्यातील विविध विकास कामांसाठी मंजूर १३९ कोटी ५१ लाख रुपयांच्या निधीपैकी डिसेंबर अखेरपर्यंत केवळ ६६ कोटी ३९ लाख ८ हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात आला असून, उर्वरित ७३ कोटी ११ लाख ९२ हजार रुपयांची विकास कामे येत्या दोन महिन्यांत मार्गी लावण्याचे आव्हान संबंधित यंत्रणांसमोर उभे ठाकले आहे. ‘मार्च एन्डिंग’ला दोन महिन्यांचा कालावधी उरला असल्याने, या कालावधीत विकास कामांचा निधी खर्च होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत २०१८-१९ या वर्षात जिल्ह्यातील विविध विकास कामांसाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत (डीपीसी) १३९ कोटी ५१ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मंजूर निधीपैकी डिसेंबर अखेरपर्यंत ६६ कोटी ३९ लाख ८ हजार रुपयांचा निधी विकास कामांवर खर्च करण्यात आला असून, उर्वरित ७३ कोटी ११ लाख ९२ हजार रुपयांचा निधी अद्याप खर्च होणे बाकी आहे. उपलब्ध निधी येत्या मार्च अखेरपर्यंत खर्च होणे अपेक्षित आहे. त्यानुषंगाने जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत ७३ कोटी ११ लाख ९२ हजार रुपयांच्या निधीची विकास कामे येत्या दोन महिन्यांत (मार्च एन्ड) मार्गी लावण्याचे आव्हान संबंधित यंत्रणांसमोर निर्माण झाले आहे. त्यामुळे येत्या दोन महिन्यांत विकास कामांचा निधी खर्च होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.निधी खर्चाचे असे आहे वास्तव!क्षेत्र                                                             निधी (लाखात)कृषी व संलग्न सेवा                                     ४९१.३७ग्राम विकास                                               २५२.८२सामाजिक व सामूहिक सेवा                        २८६४.५७पाटबंधारे आणि पूरनियंत्रण                        २१०.००ऊर्जा                                                           २८१.२६उद्योग व खाण                                            ३०.६३परिवहन                                                     १९०५.३५सामान्य आर्थिक सेवा                                 १४८.४१सामान्य सेवा                                                १५.२१नावीन्यपूर्ण व बळकटीकरण                        ४३९.४६...........................................................................एकूण                                                        ६६३९.०८ ८४.४९ कोटींचा निधी वितरित!जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत मंजूर १३९ कोटी ५१ लाख रुपयांच्या निधीपैकी शासनामार्फत ९७ कोटी ७० लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला. उपलब्ध निधीतून ८४ कोटी ४९ लाख रुपयांचा निधी संबंधित यंत्रांना वितरित करण्यात आला. त्यापैकी आतापर्यंत ६६ कोटी ३९ लाख ८ हजार रुपयांचा निधी विकासकामांवर खर्च करण्यात आला आहे. 

जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत मंजूर निधीपैकी आतापर्यंत ९७ कोटी ७० लाख रुपयांचा निधी शासनाकडून मिळाला आहे. त्यापैकी ८४ कोटी ४९ लाख रुपयांचा निधी यंत्रणांना वितरित करण्यात आला आहे. मंजूर निधी येत्या मार्च अखेरपर्यंत अखर्चित राहणार नाही, याबाबत दक्षता घेण्यात येत आहे.- ज्ञानेश्वर आंबेकरजिल्हा नियोजन अधिकारी

 

टॅग्स :Akolaअकोला