शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

...तर नववर्षात महाराष्ट्रात चक्का जाम :  बालाजी शिंदे यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 12:58 IST

अकोला - देशातील १८ राज्यात परिट-धोबी समाज अनुसुचीत जातीत असून केवळ महाराष्ट्र शासनाच्या एका चुकीमूळे हा समाज गत अनेक ...

अकोला - देशातील १८ राज्यात परिट-धोबी समाज अनुसुचीत जातीत असून केवळ महाराष्ट्र शासनाच्या एका चुकीमूळे हा समाज गत अनेक वर्षांपासून अनुसुचीत जातीच्या लाभापासुन वंचीत राहत असल्याने डिसेंबर अखेरपर्यंत राज्य शासनाने या समाजाचा अनुसुचीत जातीत समावेश करण्याची शिफारस केंद्राकडे न पाठविल्यास नववर्षात महाराष्ट्रभर चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा अखील भारतीय परिट-धोबी महासमाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी रविवारी येथे आयोजीत पत्रकार परिषदेत दिला.महाराष्ट्र शासनाने तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमूख यांच्या कार्यकाळात भांडे समिती स्थापन करून परिट-धोबी समाजाचा अनुसुचीत जमातीत समावेश करण्यासाठी अभ्यास करण्यात आला. या समितीने तयार केलेल्या अहवालात धोबी समाज हा अस्पृश्य असल्याचे संपुर्ण निकष पुर्ण करीत असल्याने त्यांचा समावेश अनुसुचीत जातीत करण्याची शिफारस करण्यात आली, मात्र त्यानंतर पुन्हा हा मुद्दा प्रलंबीत ठेवण्यात आला. या कालावधीनंतर सद्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमदार असतांना त्यांनी २०१० मध्ये परिट-धोबी समाजाला अनुसुचीत जातीत समावेश करण्यासाठी नागपूरच्या अधिवेशनामध्ये मुद्दा मांडला, मात्र आता ते स्वता मुख्यमंत्री असतांनाही धोबी समाजाचा अनुसुचीत जातीत समावेश करण्यासाठीची शिफारस करीत नसल्याचे वास्तव आहे. त्यामूळे मराठा समाजाला ज्याप्रमाणे तातडीने १६ टक्के आरक्षण देण्याचे जाहिर केले आहे, त्याच तातडीने परिट-धोबी समाजाचा अनुसुचीत जातीत समावेश करण्यासाठी तातडीने शिफारस करण्याची मागणी शिंदे यांनी केली आहे. महाराष्ट्र शासनाने ही शिफारस डिसेंबर २०१८ पर्यंत न केल्यास नववर्षात परिट-धोबी समाज बारा बलुतेदारांना सोबत घेउन राज्यभर चक्का जाम आंदोलन करणार असल्याचा इशाराही यावेळी बालाजी शिंदे यांनी दिला. परिट-धोबी समाज संख्येने कमी असला तरी न्हावी, कुंभार, सुतार, लोहार यासह अल्पसंख्याकांना सोबत घेउन या शासनाविरोधात थंड थोपटणार असल्याचेही शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. आम्ही सरकार सत्तेत आणण्यास सक्षम नसलो तरी कोणत्याही पक्षाचे आमदार, खासदार यांच्याविरोधात मतदान करून त्यांचे संख्याबळ कमी करण्याची ताकद परिट-धोबी समाज व बारा बलुतेदारांमध्ये असल्याचे बालाजी शिंदे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेला संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष तथा परिट धोबी समाजाचे गोपी चाकर व पदाधिकारी उपस्थित होते.

 

टॅग्स :Akolaअकोलाagitationआंदोलन