अकोला: महिला व बाल कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणार्या प्रशिक्षणाच्या योजना मार्गी लावण्याच्या मुद्दय़ावर चर्चा करण्यासाठी गेलेल्या जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण सभापती द्रौपदा वाहोकार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) एम.देवेंदर सिंह यांच्यात शुक्रवारी खडाजंगी झाली. त्यामध्ये सभापती वाहोकार सीईओंच्या कक्षात भोवळ येऊन कोसळल्या. त्यांना शहरातील खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. महिला व बाल कल्याण विभागामार्फत महिला लाभार्थींसाठी संगणक प्रशिक्षण, संगणक दुरुस्ती, दुग्धजन्य पदार्थाचे उत्पादन करणे, सौंदर्य प्रसाधने व इतर प्रशिक्षणाच्या योजना मार्गी लावण्यासाठी प्रशिक्षण देणार्या संस्थांना तातडीने आदेश देण्यासाठी महिला व बाल कल्याण सभापती द्रौपदा वाहोकार काही महिलांसह जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कक्षात गेल्या. चर्चेदरम्यान सभापती वाहोकार व सीईओ एम.देवेंदर सिंह यांच्यात चांगली खडाजंगी झाली व त्या सीईओंच्या कक्षात भोवळ येऊन कोसळल्या. सभापतींचे पती परसराम वाहोकार यांनी तातडीने द्रौपदा वाहोकार यांना शहरातील एका खासगी रुग्णालयात भरती केले.
.. सीईओंच्या कक्षात सभापतींना आली भोवळ!
By admin | Updated: March 19, 2016 01:57 IST