शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्रमाणपत्र दिले, पण कर्जमाफीचा छदामही नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 01:30 IST

अकोला: कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या  जिल्हय़ातील शेतकर्‍यांपैकी ५६ शेतकर्‍यांना कर्जमाफीचे प्रमाण पत्र देण्यात आले; मात्र प्रमाणपत्र दिल्यानंतर सात दिवसांचा  कालावधी उलटून जात असला तरी, कर्जमाफीचे प्रमाणपत्र  दिलेल्या शेतकर्‍यांच्या कर्जखात्यात मंगळवारपर्यंत छदामही  जमा करण्यात आला नाही.

ठळक मुद्दे५६ शेतकर्‍यांच्या कर्जखात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होणार  केव्हा?पातूर तालुक्यात पाच शेतकर्‍यांकडून परत घेतले कर्जमाफीचे  प्रमाणपत्र!

संतोष येलकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या  जिल्हय़ातील शेतकर्‍यांपैकी ५६ शेतकर्‍यांना कर्जमाफीचे प्रमाण पत्र देण्यात आले; मात्र प्रमाणपत्र दिल्यानंतर सात दिवसांचा  कालावधी उलटून जात असला तरी, कर्जमाफीचे प्रमाणपत्र  दिलेल्या शेतकर्‍यांच्या कर्जखात्यात मंगळवारपर्यंत छदामही  जमा करण्यात आला नाही. त्यामुळे  शेतकर्‍यांच्या कर्जखात्यात  कर्जमाफीची रक्कम केव्हा जमा होणार आणि शेतकर्‍यांना  कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ केव्हा मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह  निर्माण झाले आहे.सन २00९ ते ३0 जून २0१६ पर्यंत राज्यातील थकबाकीदार शे तकर्‍यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. कर्जमाफी योजनेंतर्गत थकबाकीदार शेतकर्‍यांना दीड लाख रु पयांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार असून, कर्जाची नियमित पर तफेड करणार्‍या शेतकर्‍यांना २५ हजार रुपयांपर्यंंत प्रोत्साहनपर  अनुदान आणि कर्जाचे पुनर्गठन करण्यात आलेल्या शेतकर्‍यांना  विशेष योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. त्यानुषंगाने जिल्हय़ा तील थकबाकीदार शेतकर्‍यांचे कर्जमाफीचे ‘ऑनलाइन’ अर्ज  शासनाच्या ‘आपले सरकार’ या संकेतस्थळावर भरण्याचे काम  २२ सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्यात आले. ऑनलाइन भरलेल्या  अर्जांंच्या पडताळणीत जिल्हय़ात १ लाख ९१ हजार १८७ शे तकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरविण्यात आले. त्यामध्ये जिल्हा  मध्यवर्ती सहकारी बँक आणि राष्ट्रीयीकृत बँकांच्या  थकबाकीदार शेतकर्‍यांचा समावेश आहे. कर्जमाफीसाठी पात्र  ठरलेल्या शेतकर्‍यांपैकी प्रातिनिधिक स्वरूपात ५६ शेतकर्‍यांना  १८ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा  नियोजन सभागृहात आयोजित कार्यक्रमात कर्जमाफीचे प्रमाणपत्र  देण्यात आले. सात दिवसांचा कालावधी उलटून गेला; परंतु अद्यापही  कर्जमाफीचे प्रमाणपत्र देण्यात आलेल्या शेतकर्‍यांच्या कर्जखा त्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली नाही. कर्जखा त्यात छदामही जमा झाला नसल्याने, प्रमाणपत्र दिलेल्या शे तकर्‍यांच्या कर्जखात्यात कर्जमाफीची रक्कम केव्हा जमा होणार  आणि संबंधित शेतकर्‍यांना कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ केव्हा  मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.  

पातूर तालुक्यात पाच शेतकर्‍यांकडून परत घेतले कर्जमाफीचे  प्रमाणपत्र!कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या जिल्हय़ातील शेतकर्‍यांपैकी ५६  शेतकर्‍यांना १८ ऑक्टोबर रोजी कर्जमाफीचे प्रमाणपत्र देण्यात  आले. त्यापैकी पातूर तालुक्यात पाच शेतकर्‍यांकडून  कर्जमाफीचे प्रमाणपत्र जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या  संबंधित गटसचिवांकडून परत घेण्यात आले. त्यामध्ये भंडारज  येथील प्रमोद रामभाऊ गव्हाळे, आस्टूलचे पंजाबराव इंगळे,  भानोसचे कसमदास राठोड, अंबाशी व माळराजुरा येथील प्र त्येकी एका शेतकर्‍याकडून कर्जमाफीचे प्रमाणपत्र परत घेण्यात  आले.

 १ लाख ९१ शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ दूरच!सात दिवसांपूर्वी कर्जमाफीचे प्रमाणपत्र दिलेल्या ५६ शेतकर्‍यांना  कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ अद्याप मिळाला नाही. त्यानुषंगाने  कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या जिल्हय़ा तील उर्वरित १ लाख ९१ हजार १३१ शेतकर्‍यांना कर्जमाफीचा  प्रत्यक्ष लाभ मिळणे दूरच असल्याचे वास्तव आहे.

कर्जमाफीचे प्रमाणपत्र देण्यात आलेल्या जिल्हय़ातील ५६ शे तकर्‍यांच्या कर्जखात्यात कर्जाची रक्कम जमा करून, जमा  केलेल्या कर्जाच्या रकमेची मागणी संबंधित बँकांनी शासनाकडे  करावयाची आहे. कर्जमाफीचे प्रमाणपत्र दिलेल्या ५६ शे तकर्‍यांच्या कर्जखात्यात कर्जाची रक्कम जमा केल्याचा  अहवाल अद्याप बँकांकडून प्राप्त झाला नाही.- जी.जी. मावळे, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था)

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी