शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

म्हशी खरेदीसाठी आयुक्तांसह ‘सीईओ’ बाजारात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 12:26 IST

लाभार्थींसोबतच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक आयुष प्रसाद बडनेरा येथील बाजारात पोहोचले.

अकोला : जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या दूधपूर्णा योजनेंतर्गत जिल्ह्यातील लाभार्थींसह जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) तथा प्रशासक आयुष प्रसाद, अमरावती विभागीय आयुक्त पीयूष सिंह शुक्रवारी बडनेरा येथील बाजारात पोहोचले. त्यांच्या उपस्थितीत लाभार्थींसाठी बाजारात २२ म्हशी खरेदी करण्यात आल्या.जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत दूधपूर्णा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील लाभार्थींना म्हशी खरेदीसाठी प्रत्येकी ४२ हजार ५०० रुपयांप्रमाणे अनुदान उपलब्ध करून देण्यात येत आहे. जिल्ह्यात दुधाचे उत्पादन वाढावे, लाभार्थींना चांगल्या दर्जाच्या म्हशी मिळाव्या आणि म्हशींच्या खरेदीत अनियमितता होऊ नये, यासाठी जिल्ह्याबाहेरील बाजारातून म्हशींची खरेदी करण्यात येत आहे. त्यानुषंगाने ६ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील २२ लाभार्थी म्हशी खरेदीसाठी अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथील बाजारात पोहोचले. लाभार्थींसोबतच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक आयुष प्रसाद बडनेरा येथील बाजारात पोहोचले. त्यांच्या विनंतीनुसार विभागीय आयुक्त पीयूष सिंह बडनेरा येथील बाजारात पोहोचले. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय आयुक्त आणि जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. मिश्रा व संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत २१ लाभार्थींसाठी २१ म्हशी खरेदी करण्यात आल्या. तसेच एका लाभार्थीने स्वत:च्या पैशाने म्हैस खरेदी केली.विभागीय आयुक्तांनी व्यक्त केले समाधान!अकोला जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत दूधपूर्णा योजनेंतर्गत जिल्ह्याबाहेरील चांगल्या म्हशी खरेदी करण्यात येत असून, लाभार्थींसोबतच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत म्हशींची खरेदी करण्यात येत असल्याने, विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी त्यांनी लाभार्थींसोबत चर्चा करून दूध व्यवसायासाठी सदिच्छा दिल्या. 

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद