शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणचे अनुकरण करण्याची केंद्रीय उर्जा राज्य मंत्र्यांची सूचना

By admin | Updated: November 8, 2014 23:31 IST

महावितरण होत आहे देशपातळीवर स्टडी हब.

विवेक चांदूरकर/अकोला फिडरनिहाय भारनियमनाचा फॉर्म्युला आणि तत्सम विविध योजनांमुळे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण) विद्युत क्षेत्रातील आशियातील सर्वात मोठी कंपनी बनल्याच्या पार्श्‍वभूमीवर, देशातील तब्बल दहा राज्यांनी महावितरणच्या विविध योजनांचा अभ्यास केला असून, केंद्रीय उर्जा राज्य मंत्र्यांनीही इतर राज्यांना महावितरणचे अनुकरण करण्याच्या सूचना दिल्यामुळे, महावितरण देशपातळीवर स्टडी हब बनले आहे. मागणीएवढा विद्युत पुरवठा उपलब्ध असल्यावरही ज्या भागात विजेची चोरी व गळती होते, त्या भागात भारनियमन करण्याचा नवा प्रयोग महावितरण राबवित आहे. परिणामी नियमित वीज देयके अदा करणार्‍यांना अखंडित विद्युत पुरवठा होत आहे, तर देयके अदा न करणार्‍यांना भारनियमन सहन करावे लागत आहे. त्यामुळे वीज गळती कमी होत असल्याचे आशादायी चित्र आहे. फिडरनिहाय भारनियमन करणारी महावितरण ही देशातील पहिली कंपनी आहे. याशिवाय महावितरणने रेडिओ फ्रिक्वेन्सी व इन्फ्रा रेड मीटर लावणे सुरू केले आहे. त्यामुळे कंपनी नफ्यात आली आहे. तब्बल दोन कोटी ग्राहकांना विद्युत पुरवठा करून, त्याची नियमित वसुली होत असल्यामुळे, सर्व देशाचे लक्ष महावितरणकडे वेधल्या गेले आहे.*स्वत: विकसित केली आज्ञावली महावितरण २0१0 पासून ऑनलाईन जोडणी देणे, मीटर वाचन, देयक अदायगी ही सर्व कामे संगणीकृत यंत्रणेच्या मार्फत राबवित आहे. महावितरणने फोटो मीटर रिंडीग, कॉल सेंटर आदी बाबी सुरू केल्या आहेत. व्यवस्थापकीय माहिती प्रणाली (एमआयएस)मध्ये पूर्णपणे ताळमेळ घालण्यात आला आहे.