शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींच्या कर्ज प्रकरणी सेंट्रल बँकेचा सावळा गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 12:54 IST

राष्ट्रीयीकृत बँकेत होत असलेला सावळा गोंधळ लक्षात घेत लीड बँकेने याची गंभीरतेने चौकशी सुरू केली आहे.

- संजय खांडेकर लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अशिक्षित आदिवासी खातेदाराला अंधारात ठेवून त्याच्या नावावर पाच लाखांचे कर्ज काढून प्रत्यक्षात केवळ एक लाख दिल्याच्या तक्रारीने सेंट्रल बँक आॅफ इंडिया अडगाव शाखा वादात सापडली आहे. लीड बँकेने याप्रकरणी चौकशी सुरू केली असून, दोषींवर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.तेल्हारा तालुक्यात येणाऱ्या बेली येथील शांतिलाल गवते या आदिवासी व्यक्तीने अडगाव बु. येथील सेंट्रल बँक आॅफ इंडियाच्या शाखेतून कर्ज घेतले. निवृत्ती आणि चेतन नामक दोन फायनान्स एजंटच्या माध्यमातून हे कर्ज घेण्यात आले. गवते यांच्या नावाने पाच लाखांचे कर्ज मंजूर झाले; मात्र प्रत्यक्षात गवतेंना केवळ एक लाख रुपये देण्यात आले. ही गंभीर बाब गवते यांना समजल्यानंतर त्यांनी १८ आॅक्टोबर २०१९ रोजी सेंट्रल बँकेच्या वरिष्ठांकडे आणि पोलिसांकडे तक्रार केली. गवते यांनी तक्रार केल्याची माहिती कळताच फायनान्स एजंट आणि बँकेचे शाखाधिकारी राजेश शिंगारी यांनी राजकीय पुढारी आणि पोलिसांना हाताशी धरून सावरासावर सुरू केली. कागदोपत्री प्रकरण दडपण्याचे सर्व प्रयोग सुरू झाले आहे. याच कारणामुळे तक्रारकर्ता गवते यांनी केलेली तक्रार मागे घेतली. माझा कुणावरही कोणताही आक्षेप नसून, मीच पाच लाखांचे कर्ज घेतल्याचा खुलासा सेंट्रल बँक आणि पोलिसांकडे केला आहे. तक्रारकर्त्याने माघार घेतली असली तरी राष्ट्रीयीकृत बँकेत होत असलेला सावळा गोंधळ लक्षात घेत लीड बँकेने याची गंभीरतेने चौकशी सुरू केली आहे. अडगाव येथील बँक मॅनेजर राजेश शिंगारी, फायनान्स एजंट आणि तक्रारकर्त्याचे जबाब नोंदविले जात आहे. सोबतच त्या काळातील आॅडिट रिपोर्टदेखील तपासले जात आहे.

२० ते २५ खातेदारआदिवासींच्या नावे अव्वाच्या सव्वा कर्ज घेऊन त्यांना नाममात्र रक्कम दिल्या जात असून, असे २० ते २५ खातेदार असल्याची परिसरात चर्चा आहे. यानिमित्ताने त्या दिशेनेदेखील लीड बँकेने चौकशी करून सावळा गोंधळ चव्हाट्यावर आणावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

टॅग्स :Akolaअकोलाbankबँक