शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

बचत गटांच्या उत्पादन विक्रीसाठी केंद्रच नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 13:14 IST

अकोला: महिला बचत गटातील सदस्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रत्येक जिल्हा, तालुकास्तरावर त्यांच्या उत्पादनासाठी कायमस्वरूपी विक्री केंद्र उभारण्याचा शासनाचा उपक्रम गेल्या दहा वर्षापासून कागदावरच आहे.

- सदानंद सिरसाटअकोला: महिला बचत गटातील सदस्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रत्येक जिल्हा, तालुकास्तरावर त्यांच्या उत्पादनासाठी कायमस्वरूपी विक्री केंद्र उभारण्याचा शासनाचा उपक्रम गेल्या दहा वर्षापासून कागदावरच आहे. विक्री केंद्रांची निर्मिती न झाल्याने दरवर्षी राज्यातील ३५ जिल्ह्यांमध्ये स्वस्ती प्रदर्शनावर कोट्यवधी रुपये खर्च करण्याचा सोपस्कार पार पाडला जात आहे.ग्रामविकास विभागाने १९९९ पासून दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील व्यक्तींचे जीवनमान उंचावण्यासाठी देशातील प्रगत तंत्रज्ञान सोप्या पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोहचवून त्यांना रोजगार देणे, प्रतिमाह दोन हजार रुपयांपर्यंत त्यांचे उत्पादन व्हावे, यासाठी स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजना राबवण्यात आली. त्यासाठी बचत गटांना कर्जही देण्यात आले. स्वरोजगारातून तयार झालेल्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ मिळावी, यासाठी प्रत्येक विभाग, जिल्हा पातळीवर विक्री प्रदर्शने आयोजित करणे, प्रत्येक जिल्हा, तालुका ठिकाणी कायमस्वरूपी विक्री केंद्र उभारण्याला मंत्रिमंडळाच्या १८ सप्टेंबर २००८ रोजीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यासाठी निधीची तरतूदही ठरवण्यात आली; मात्र त्यानंतर विक्री केंद्र उभारण्याचा उपक्रम पूर्णपणे कागदावरच राहिला. राज्यातील कोणत्या जिल्ह्यात अशी विक्री केंद्र उभारण्यात आली, याची कोणतीच माहिती पुढे आलेली नाही. त्याचवेळी दरवर्षी प्रत्येक जिल्ह्यात १० लाख रुपये खर्च करून वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करण्यासाठी निधी दिला जातो. विभागस्तरावर हा निधी ३५ लाख रुपये दिला जातो. दरवर्षी ४ कोटी ९० लाख रुपये त्यासाठी खर्च होतात. त्यातून बचत गटांच्या महिलांच्या हातात किती रोजगार पडते, ही बाब आता शोधाची झाली आहे. त्याचीही माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा स्तरावर आहे की नाही, याचाही धांडोळा घेण्याची वेळ आली आहे.- तीन वर्षाची मुदतही संपलीसंपूर्ण राज्यभरात कायमस्वरूपी विक्री केंद्र बांधण्यासाठी राज्यात तीन वर्षांची मुदतही ठरवून देण्यात आली होती. ती केव्हाच उलटली. केंद्र कुठे अस्तित्वात आली, याची माहिती आता शासनाकडूनच घ्यावी लागणार आहे. जिल्हा केंद्रासाठी ५० लाख तर तालुका केंद्रासाठी २५ लाख रुपये निधी देण्याची तयारीही शासनाने केली होती. जिल्ह्यातील बचत गटांना रोटेशन पद्धतीने पंधरा दिवसांसाठी केंद्रे उपलब्ध होती.- जिल्हा परिषदेच्या जागा पडूनजिल्हा परिषदेच्या मालकीच्या जागावर केंद्र उभारण्याचे प्रस्ताव शासनाने मागवले होते. जिल्हा परिषदांच्या जागा पडून असल्यावरही तेथे केंद्रांची उभारणी झाली नाही, हे विशेष.

 

टॅग्स :Akolaअकोला