शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रनिहाय मतदानाचा अहवाल मागविला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 12:38 IST

मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रनिहाय अहवाल मागविण्यात आला आहे.

अकोला : अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांद्वारे (ईव्हीएम) घेण्यात आलेल्या मतदान प्रक्रियेत झालेल्या मतदानाच्या आकडेवारीमध्ये फरक आहे काय, यासंदर्भात मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रनिहाय अहवाल मागविण्यात आला आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी राजेश खवले यांनी रविवारी यांनी दिली.अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी गत १८ एप्रिल रोजी मतदान घेण्यात आले असून, २३ मे रोजी मतमोजणी झाली आहे. मतदान प्रक्रियेत ‘ईव्हीएम’द्वारे ११ लाख १६ हजार ७६३ मतदान झाले होते. तसेच टपाली मतपत्रिकांद्वारे ३ हजार २८३ मतदान झाले. त्यानुसार एकूण ११ लाख २० हजार ४६ मतदान झाले असले तरी मतमोजणी प्रक्रियेत ११ लाख २० हजार १८५ मतांची मोजणी करण्यात आली. त्यानुषंगाने मतदान प्रक्रियेत मतदान केंद्रांवरील ईव्हीएमद्वारे मतदानाची मतदान केंद्राध्यक्षांकडून सादर करण्यात आलेल्या आकडेवारीमध्ये फरक आहे काय, यासंदर्भात मतदान केंद्रनिहाय झालेल्या मतदानाच्या आकडेवारीचा अहवाल मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकाºयांकडून मागविण्यात आला आहे. अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचनाही सहायक निवडणूक निर्णय अधिकाºयांना देण्यात आल्या, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजेश खवले यांनी सांगितले.

 

टॅग्स :AkolaअकोलाLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालakola-pcअकोला