शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गम, अतिदुर्गम भागात आदिवासींचे पाडे, वस्त्यांना जोडण्यासाठी केंद्राचा निधी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 14:27 IST

अकोला: कें द्र शासनाने आदिवासी विकास विभागाला केवळ रस्त्यांचे निर्माण करण्यासाठी १७ कोटी ३८ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

ठळक मुद्दे१०० पेक्षा जास्त लोकसंख्येच्या भागात उभारणार रस्ते. रस्त्यांचे निर्माण करण्यासाठी १७ कोटी ३८ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.आदिवासी नागरिक विकासाच्या प्रवाहापासून कोसो दूर असल्याचे चित्र आहे.

- आशिष गावंडेअकोला: दुर्गम, अतिदुर्गम भागात राहणाºया आदिवासींना शाळा, आरोग्याची सुविधा उपलब्ध होत नसल्याने त्यांची हेळसांड होते. १०० पेक्षा जास्त आदिवासी लोकसंख्येच्या भागात रस्त्यांची नितांत आवश्यकता असल्यामुळे कें द्र शासनाने आदिवासी विकास विभागाला केवळ रस्त्यांचे निर्माण करण्यासाठी १७ कोटी ३८ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. प्राप्त निधीतून आदिवासी लोकसंख्येच्या वाड्या, पाडे, वस्त्यांपर्यंत रस्ते तयार के ले जाणार आहेत.राज्यातील दुर्गम, अतिदुर्गम भागात राहणाºया आदिवासींपर्यंत पोहोचण्यासाठी रस्ते उपलब्ध नाहीत. डोंगर-माथा, जंगलातून वाट काढत आदिम जमातीच्या वस्त्यांपर्यंत पोहोचताना प्रशासकीय यंत्रणांची तारांबळ उडते. त्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ते तयार नसल्यामुळे आदिम जमातीच्या वस्त्या, पाडे, वाड्यातील नागरिकांना मूलभूत सुविधांची पूर्तता करणे शक्य होत नसल्याची परिस्थिती आहे. त्याठिकाणी शाळा, आरोग्य केंद्र तसेच कुपोषण टाळण्यासाठी विविध प्रकारच्या प्रशिक्षण केंद्रांचा अभाव राहत असल्यामुळे आजही आदिवासी नागरिक विकासाच्या प्रवाहापासून कोसो दूर असल्याचे चित्र आहे. आदिवासी विकास विभागामार्फत विविध योजना राबविल्या जात असल्या तरी त्या पूर्ण करण्यासाठी निधीची कमतरता भासते. त्यामुळे आदिम जमातीच्या १०० पेक्षा अधिक लोकसंख्येच्या वाड्या, पाडे, वस्त्यांपर्यंत पोहोचण्यासाठी रस्ते तयार करण्याकरिता २ डिसेंबर रोजी केंद्र शासनाने १७ कोटी ३५ लाख रुपये निधी मंजूर केला आहे.१०८ रस्त्यांसह पुलांचे कामराज्यात गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी, एटापल्ली, भामरागड, पालघरमधील विक्रमगड, डहाणू, जव्हार, तलासरी, रायगड जिल्ह्यातील खालापूर, कर्जत येथील आदिवासी भागात १०८ रस्त्यांसह विविध ठिकाणच्या पुलांचे बांधकाम केले जाणार आहे. या कामाचे प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीकडून प्राप्त झाले होते.