शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

फेब्रुवारीपासून गोणीमागे २० रुपयांनी वधारणार सिमेंटचे भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 10:58 IST

एकाच महिन्यात दुसऱ्यांदा गोणीमागे ५० रुपयांची दरवाढ होत असल्याने बांधकाम व्यावसायिक हादरले आहेत.

- संजय खांडेकर 

अकोला: रॉयल्टी आणि वाहतुकीच्या अतिरिक्त खर्चावर बोट ठेवून सिमेंट कंपन्यांनी प्रति गोणीमागे २० रुपयांची दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. १ फेब्रुवारी २०२० पासून ही दरवाढ होण्याचे संकेत आहेत. एकाच महिन्यात दुसऱ्यांदा गोणीमागे ५० रुपयांची दरवाढ होत असल्याने बांधकाम व्यावसायिक हादरले आहेत.महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशातील सिमेंट कंपन्यांनी एकत्रित येऊन सिमेंटच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला. जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात तशी औपचारिक घोषणा झाली होती. मागील आठवड्यात सिमेंट कंपन्यांनी गोणीमागे २५ ते ३० रुपयांनी दरवाढदेखील केली; मात्र रॉयल्टी आणि वाहतुकीचा खर्च लक्षात घेता ही दरवाढ कमी असल्याचा सूर उमटला. त्यामुळे पुन्हा २० रुपयांनी सिमेंटच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही दरवाढ येत्या १ फेब्रुवारीपासून केली जाणार असून, त्यासंदर्भातील संदेश ठोक आणि किरकोळ विक्रेत्यांना पाठविले जात आहे. एकाच महिन्यात तब्बल ५० रुपयांनी सिमेंटमध्ये दरवाढ होत असल्याने राज्यात कृत्रिम तुटवडा निर्माण केला जात आहे. असे आहेत सिमेंट विक्रीचे दरआंध्र प्रदेशातील सर्वात स्वस्त विकल्या जाणाºया सिमेंटच्या दरातही वाढ झाली आहे. आंध्रातील डेंकन, सागर, महागोल्ड, महाशक्ती जानेवारी महिन्याच्या पूर्वी २२० रुपये गोणीप्रमाणे आणि अंबुजा, अल्ट्राटेक कंपनीचे सिमेंट २७५ रुपये गोणीप्रमाणे विकल्या जात असे; मात्र जानेवारीनंतर आंध्रातील सिमेंट २५० रुपये गोणीप्रमाणे आणि अंबुजा, अल्ट्राटेकचे सिमेंट ३०० रुपये गोणीप्रमाणे झाले.दरवर्षी जानेवारी महिन्यात सिमेंट कंपन्यांकडून दरवाढ होते. बांधकाम व्यावयिकांपेक्षा शासन आणि सामान्य माणसांवर याचा परिणाम जास्त होतो; मात्र त्याकडे कुणी लक्ष देत नाही.- पंकज कोठारी, माजी राज्य उपाध्यक्ष, क्रेडाई.मंदीमुळे राज्यातील बांधकाम व्यावसायिक आधीच भरडला गेला आहे. त्यात लोखंड आणि सिमेंटमध्ये सातत्याने वाढ होत आहे. शासनाने धोरण बदलून त्यावर नियंत्रण आणण्याची गरज आहे.- दिनेश ढगे, क्रेडाई, जिल्हाध्यक्ष, अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोलाbusinessव्यवसाय