शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

रद्दी संकलन व लोकसहभागातून केली वंचितांची दिवाळी साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2017 18:53 IST

अकोल्यातील एक ध्येयवेड्याने दरवर्षी प्रमाणे यावर्षीही संकलित रद्दीच्या विक्रीतून जमा झालेली रक्कम व लोकसहभागातून वंचितांची दिवाळी गोड केली.

ठळक मुद्देपुरुषोत्तम शिंदे यांचा अनोखा उपक्रम गरजूंना कपडे व फराळाचे वाटप

अकोला : ‘फाटले आभाळ ज्यांचे हो तयाचा सोबती’ या काव्यपंक्तीप्रमाणे वंचितांची दिवाळी साजरी व्हावी, या हेतूने गत ११ वर्षांपासून झटत असलेल्या अकोल्यातील एक ध्येयवेड्याने दरवर्षी प्रमाणे यावर्षीही संकलित रद्दीच्या विक्रीतून जमा झालेली रक्कम व लोकसहभागातून वंचितांची दिवाळी गोड केली.दिवाळी म्हटली, की आनंद, उस्ताह. हा आनंद प्रत्येक जण आपापल्या परीने साजरा करीत असतो. मात्र, आपल्या आनंदात इतरांनाही सहभागी करून घेण्यासाठी धडपडणारे ध्येयवेडे फारच थोडे. दिवाळीत संपूर्ण देश एका वेगळ्या आनंदात असताना समाजातील एक घटक मात्र या सर्व उत्साह, आनंदापासून कोसो दूर असतो.अशाच वंचितांच्या जीवनात आनंद, उत्साह भरण्याचा प्रयत्न ‘स्वराज’ या संस्थेच्या माध्यमातून शिंदे करीत आहेत. नागरिकांकडून रद्दी गोळा करीत त्यातून मिळणाºया पैशातून वंचितांना दिवाळीत फराळ, कपडे देऊन त्यांच्या आयुष्यातही एका दिवसात दिवाळीच्या आनंदाचे रंग भरण्याचा प्रयत्न शिंदे करीत आहेत. यावर्षीही शिंदे यांनी सर्वोपचार रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय, जठारपेठ चौक, संत गजानन महाराज मंदिर अशा विविध ठिकाणी वंचित व गरजू लोकांना नवीन कपडे व दिवाळीच्या फराळाचे वितरण स्वहस्ते केले. या उपक्रमाअंतर्गत शिंदे यांच्या ‘स्वराज’ संघटनेने तब्बल २५० मुला-मुलींना नवीन कपडे, ९० महिलांना साड्यांचे वितरण केले. तसेच ३० जोडी धोतर व ३० नववारी लुगड्यांचेही वितरण करण्यात आले. या वंचितांना स्वराज संघटनेने दिवाळीचा फराळ देऊन त्यांचे तोंडही गोड केले.अकोलेकरांचा भरभरुन प्रतिसादघरात पडून राहत असलेली रद्दी विकून त्यातून कोणाची दिवाळी साजरी होत असेल, तर यापेक्षा दुसरे पुण्य कर्म नाही. यासाठी पुरुषोत्तम शिंदे यांनी रद्दी संकलन करण्याचे आवाहन केले होते. अकोलेकरांनी या आवाहनला प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात रद्दी ‘स्वराज’ संस्थेकडे जमा केली. या रद्दीच्या विक्रीतून आलेली रक्कम तसेच काही सहृदयी नागरिकांनी स्वत:हून पुढे येऊन केलेली मदत यातून ‘स्वराज’ संघटनेने वंचितांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न केला.‘प्रभात’च्या मुलांनीही उचलला वाटापुरुषोत्तम शिंदे यांनी केलेल्या रद्दी संकलनाच्या आवाहनास प्रतिसाद देताना प्रभात किड्स स्कुलच्या विद्यार्थ्यांनी तब्बल ८०० किलो रद्दी गोळा केली. ही सर्व रद्दी शाळेकडून ‘स्वराज’ संघटनेला देण्यात आली. यामधून अनेकांची दिवाळी साजरी होण्यात मदत झाली. 

टॅग्स :social workerसमाजसेवक