वरुर जऊळका: योगयोगेश्वर संस्थान वरुर जऊळका येथे ११ जानेवारी रोजी संताजी जगनाडे महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. त्यामध्ये गावातील मान्यवर व्यक्तींच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीलेश धांडे यांनी केले. गणेश महाराज शेटे यांनी संताजी जगनाडे महाराजांचे चरित्र सांगून आभार मानले. यावेळी श्रीकांत झापर्डे, गोपाल नायसे, आनंद नायसे, गणेश पांडव, बाळूभाऊ सोनटक्के, उल्हास सोनटक्के, शिवम सोनटक्के, गोपाल सोनटक्के, गोविंदा पांडव, पवन पांडव, विनोद इसेकर, अनिल तायडे, विशाल सोनटक्के, विनोद भाऊ नयसे, सागर पांडव, मोहन सोनटक्के, सुहास सोनटक्के, देवानंद तायडे, प्रकाश सोनटक्के, हरिभाऊ सदाफळे, प्रमोद घनबहादूर, मंगेश बावणे, जयकिसन मालवे, नारायणराव गवळी, दिलीप इंगळे, रमेश चाऱ्हाटे, हरिभाऊ भगेवर, वसंता शेटे, प्रफुल कठोळे यांच्यासह नागरिकांनी सहभाग घेतला. संताजी जगनाडे महाराज व समर्थ सद्गुरू गजानन महाराजांच्या आरतीने कार्यक्रमाचा समारोप झाला.