शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

अकोल्यात महावीर जयंती उत्साहात साजरी; शहरात काढली शोभायात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 16:18 IST

अकोला: सकल दिगंबर जैन समाजाच्या वतीने गुरुवार, २९ मार्च रोजी चोविसावे तीर्थंकर भगवान महावीर स्वामी यांची २६१६ वी जन्मकल्याणक जयंती मोठ्या भक्तिभावात साजरी करण्यात आली.

ठळक मुद्देस्थानीक गांधी जवाहर बाग येथे सकाळी स्तंभ मानवंदना व ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. महावीर स्वामींच्या विजय स्तंभाला मानवंदना देण्यात आली. आस्था महिला मंडळाच्या वतीने महावीर वंदना सादर करण्यात आली.

अकोला: सकल दिगंबर जैन समाजाच्या वतीने गुरुवार, २९ मार्च रोजी चोविसावे तीर्थंकर भगवान महावीर स्वामी यांची २६१६ वी जन्मकल्याणक जयंती मोठ्या भक्तिभावात साजरी करण्यात आली. स्थानीक गांधी जवाहर बाग येथे सकाळी स्तंभ मानवंदना व ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला.या सोहळ्यात हरीश अलिमचंदानी,समाजाचे समाजसेवी केशवराव इंदाने, पंडित शांतीलाल भीमावतं,किशोर विरदावत,जयंती सोहळ्याचे अध्यक्ष सुनील अजमेरा,आयोजन समितीचे रवींद्र जैन,बाबा उपस्थित होते. समाजसेवक अमितकुमार सेठी यांच्या अध्यक्षतेत संपन्न या सोहळ्यात बागेत असणाº्या महावीर स्वामींच्या विजय स्तंभाला मानवंदना देण्यात आली. अंजली बिलाला यांच्या मंगलाचरणाने सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला. या नंतर आस्था महिला मंडळाच्या वतीने महावीर वंदना सादर करण्यात आली. शांतीलाल भीमावत यांनी प्रास्ताविक सादर करून महावीरांच्या जयजयकार केला. भगवान महावीर यांनी संपूर्ण जगाला अहिंसा व शांतीचा महान संदेश देत गुण्यागोविंदाने जगा व दुसº्याला जगू द्या चा नारा दिला आहे. या विचारावरच आज परमाणू बॉम्ब गोळा करण्याचा दिशेने प्रयत्न करणाऱ्या राष्ट्रांनी मार्गक्रमण केले तर नक्कीच जगात शांती व सहिष्णुता नसून या देशांचा संरक्षणाचा खर्च विकास कार्यात जाऊन प्रगती होऊ शकते .म्हणून सवार्नी भगवान महावीर यांच्या विचाराची कास धरण्याचे आवाहन माजी नगराध्यक्ष हरीश अलिमचंदानी यांनी केले. संचालन व आभार रवींद्र जैन बाबा यांनी केले.शांतीनाथ चैत्यालयातून निघाली शोभायात्रासकाळी वसंत टॉकीज परिसरातील शांतीनाथ चैत्यालय येथून समाजाच्या वतीने गांधी जवाहर बाग पर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात आली. ही शोभायात्रा वसंत टॉकीज मार्गे,गांधी चौक वरून गांधी जवाहर बाग येथे पोहचून या शोभायात्रेचे समापन करण्यात आले. यावेळी श्रीपाल बिलाला, माणिकचंद झंजरी,शांतीलाल भीमावत,भागचंद बज, महावीर बिलाला,सुशील बाकलीवाल, विनोद भीमावत, रमेश सिहावत, जयेश पंचोली,ललित झंजरी, पावन गोधा, विलास पाटणी, अजय गोधा, अशोक गदिया, अनिल झाजरी, सिद्धू सेठी, विकास जैन, पारस तोरावात, मदन सिहावत, किशोर विरदवात,राजू श्रावगी,मनीष सेठी आस्था महिला मंडळाच्या अध्यक्षा ज्योती झाजरी, विभा बिलाला, निशा सेठी, सपना बिलाला ,रेखा जैन, सारिका बिलाला ,मेघ संधिया, अर्चना गोधा, सुनीता जैन, जुली बिलाला, राजकुमारी बिलाला, हेमा सेठी, किरण वीरदावत,मधू अजमेरा, बबिता झंजरी यांच्यासह शेकडो महिला, पुरुष, बच्चे कंपनी उपस्थित होते.

 

टॅग्स :AkolaअकोलाMahavir Jayanti 2018महावीर जयंती २०१८