शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत हृदय दिन साजरा

By admin | Updated: October 3, 2016 02:28 IST

हृदयरोगापासून जीवनदान मिळालेल्या चिमुकल्यांचे कौतुक करण्यात आले.

अकोला, दि. 0२- शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सभागृहात जिल्हा शल्य चिकित्सकांच्या मार्गदर्शनातील आर.बी.एस.के. पथकाने हृदय दिन कार्यक्रमाचे आयोजन केले होते.अंगणवाडी व शाळा तपासणीत वेगवेगळ्या प्रकारचे हृदय रोगाचे लहान रुग्ण आढळले. त्यांच्यावर आयकॉन हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली. उपसंचालक आरोग्य सेवा तथा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांच्या प्रयत्नाने लहान पाल्यांच्या पालकांची मुंबई - पुण्याच्या कटकटीतून मुक्तता करून राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत ४२१ मुलांच्या नोंदणीपैकी आतापर्यंंंत २८३ मुला-मुलींवर यशस्वी शस्त्रक्रिया करून त्यांच्या चेहर्‍यावर स्मितहास्य उमटवले.यशस्वी शस्त्रक्रियेच्या प्रयत्नाला राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या जिल्ह्याच्या १९ पथकाला दिले असून त्यांचे कार्य निरंतर सुरू राहण्यासाठी आपण कसोशीने प्रयत्न करण्याचे आश्‍वासन डॉ. चव्हाण यांनी याप्रसंगी दिले.डॉ. चव्हाण यांच्यासह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते, जिल्हाधिकारी यांचे प्रतिनिधी डॉ. पुरी, मनपा आयुक् तांचे प्रतिनिधी डॉ. फारुक शेख, वैद्यकीय अधीक्षक डॉ. एम.डी. राठोड, वैद्यकीय अधिकारी डॉ. सराटे, हुमणे उपस्थित होते.या चांगल्या उपक्रमामुळे समाजामध्ये परिवर्तन घडवून आणण्याचे कार्य या पथकाने दाखवून दिले, असे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते म्हणाले. प्रस्तावना नंदकिशोर कांबळे, संचालन डॉ. अश्‍विन तिवारी, आभार प्रदर्शन डॉ. राम नागे यांनी केले, असे डॉ. मनीष मेन यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.