शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील ४९८ रुग्णालयांमध्ये नव्याने बसविणार सीसी कॅमेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 13:19 IST

अकोला: सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत येणाºया राज्यातील ४९८ रुग्णालयांमध्ये नव्याने सीसी कॅमेरा आणि सीसी टीव्ही सिस्टीम बसविण्यात येणार आहे.

अकोला: सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत येणाºया राज्यातील ४९८ रुग्णालयांमध्ये नव्याने सीसी कॅमेरा आणि सीसी टीव्ही सिस्टीम बसविण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यभरातील सार्वजनिक रुग्णालयांमध्ये सीसी कॅमेऱ्यांची नजर आणखी भेदक ठरणार असून, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्याचा फायदा होणार आहे.राज्यभरातील ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, सामान्य रुग्णालये, स्त्री रुग्णालये तसेच जिल्हा रुग्णालयांमध्ये नव्याने सीसी कॅमेरा आणि सीसी टीव्हीसिस्टीम लावण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी एकूण ४ कोटी २ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आहे. सार्वजनिक रुग्णालयांचे मुख्य प्रवेशद्वार, बाह्यरुग्ण विभाग, पुरुष आंतररुग्ण विभाग, महिला आंतररुग्ण विभाग, वैद्यकीय अधिकारी कक्ष, शस्त्रक्रिया गृह आवार, लेबर रूम, बाल रुग्ण कक्षामध्ये सीसी कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.वºहाडात २० सीस्टीम व ५८ कॅमेरेवºहाडातील अकोला, बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यात एकूण ५८ सीसी कॅमेरे आणि २० सीसी टीव्ही सीस्टीम लावण्यात येणार आहेत. यामध्ये सर्वच ग्रामीण रुग्णालयात केवळ सीसी टीव्ही सीस्टीम लावण्यात येईल.जिल्हानिहाय रुग्णालयेअकोलाजिल्ह्यातील अकोट, बाळापूर, बार्शीटाकळी, चतारी, तेल्हारा ग्रामीण रुग्णालयांमध्ये प्रत्येकी एक सीसी टीव्ही सिस्टीम लावण्यात येईल. शिवाय, जिल्हा स्त्री रुग्णालयात ८, उपजिल्हा रुग्णालय मूर्तिजापूर येथे १४ सीसी कॅमेरे आणि एक सीसी टीव्ही सिस्टीम लावण्यात येईल.बुलडाणाजिल्ह्यातील ढाड, देऊळगाव माही, देऊळगाव राजा, जळगाव जामोद, लोणार, मेहकर, मोताळा, सिंदखेड राजा येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये प्रत्येकी एक सीसी टीव्ही सिस्टीम बसविण्यात येईल. शिवाय, शेगाव येथील रुग्णालयात १४ सीसी कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.वाशिमजिल्ह्यातील कमरगाव, अनसिंग आणि मालेगाव या ग्रामीण रुग्णालयांमध्ये प्रत्येकी एक सीसी टीव्ही सिस्टीम, तर कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालयात १४ सीसी कॅमेरा आणि एक सीसी टीव्ही सिस्टीम लावण्यात येईल. जिल्हा रुग्णालयात १६ सीसी कॅमेºयांना मान्यता देण्यात आली आहे.सर्वाजनिक आरोग्य विभागांतर्गत येणाºया ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, तसेच स्त्री रुग्णालय व जिल्हा रुग्णालयात सीसी कॅमेरा आणि सीसी टीव्ही सिस्टीम बसविण्यासाठी शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे रुग्णालयाच्या सुरक्षेमध्ये वाढ होणार असून, प्रत्येक घटनांवर लक्ष ठेवता येणार आहे.- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला

 

टॅग्स :Akolaअकोलाhospitalहॉस्पिटलcctvसीसीटीव्ही