शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

खबरदारी निवडणुकीची..

By admin | Updated: October 8, 2014 00:52 IST

अकोला पोलिसांनी केले २२१ पैकी ११९ शस्त्र जमा.

अकोला: विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलिस विभागाकडून शहरातील परवाना असलेल्या शस्त्रधारकांना पोलिस ठाण्यांमध्ये शस्त्र जमा करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शहरातील २२१ परवाना शस्त्रधारकांपैकी केवळ ११९ जणांनी शस्त्र संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये जमा केले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेद्वारे विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. या पृष्ठभूमीवर आचारसंहिता लागू करण्यात आली. निवडणूक काळात जिल्हय़ातील कायदा व सुव्यवस्था बाधित होऊ नये, मतदारांना विशिष्ट उमेदवारालाच मतदान करण्यासाठी शस्त्राचा धाक दाखवू शकतात. तसेच निवडणूक काळामध्ये परवानाधारक व्यक्तीकडून शस्त्राचा दुरुपयोग होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांच्या आदेशावरून शस्त्र छाननी समितीने संपूर्ण शस्त्र परवानाधारकाचा पूर्व इतिहास तपासून घेतल्यानंतर, ज्या परवानाधारकाचा राजकीय व्यक्तींशी किंवा उमेदवाराशी जवळचा संबंध आहे. तसेच त्याच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. शस्त्राचा दुरुपयोग केल्याचा आरोप आहे, अशा शस्त्र परवानाधारक व्यक्तीचे शस्त्र जमा करण्याचे निर्देश शस्त्र छाननी समितीने दिले होते. जिल्हाधिकार्‍यांनी दंडप्रक्रिया संहिता १९७३ कलम १४४ अन्वये शस्त्र परवानाधारकांना शस्त्र बाळगण्याबाबत बंदी घातली आहे. या आदेशातून राष्ट्रीयीकृत बँका, प तसंस्था, सुरक्षा कर्मचारी, पोलिस कर्मचारी यांना वगळण्यात आले आहे. * जिल्हय़ात ४३३ परवाना शस्त्रधारकजिल्ह्यात एकूण ४३३ शस्त्रे परवाने आहेत. एकूण ३८५ शस्त्रे आणि परवाने तपासण्यात आले. उर्वरि त शस्त्रांची तपासणी करण्यात येत आहे. त्यापैकी इतर शस्त्र लवकरच संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये जमा करण्यात येणार आहेत.