शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मोर्णाकाठच्या नागरी वसाहतींना सावधानतेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 13:18 IST

मोर्णा नदीकाठच्या नागरी वसाहतींना सावध राहण्याचा इशारा महापालिका प्रशानसाने दिला आहे.

ठळक मुद्दे संततधार पावसामुळे अकोल्यातील मोर्णा नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीकाठच्या लोकांनी तात्पुरता आपले बिºहाड हलवावे, असे आवाहन मनपा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

अकोला: संततधार पावसामुळे अकोल्यातील मोर्णा नदी दुथडी भरून वाहत आहे. पावसाचा जोरआगामी दोन दिवसात कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे मोर्णा नदीकाठच्या नागरी वसाहतींना सावध राहण्याचा इशारा महापालिका प्रशानसाने दिला आहे.मोर्णा नदीने अकोला शहराला दोन भागात विभागले असून, नदीकाठावर दोन्ही बाजूंनी वसाहती वसल्या आहे. पाण्याची पातळी थोडी जरी वाढली तरी या वसाहतींमध्ये पाणी शिरते. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गुरुवारी उत्तर रात्री महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १२ मधील काही भागात पाणी शिरले. नागरिकांनी सतर्क राहावे म्हणून महापालिकेची चमू परिसरात लक्ष ठेवून आहे. दरम्यान, या प्रभागातील भाजपा नगरसेवक अजय शर्मा यांनी यासंदर्भात मनपा आयुक्तांशी संपर्क साधला. आयुक्तांच्या आदेशन्वये क्षेत्रीय अधिकारी डॉ. दीपाली भोसले, वासुदेव वाघाडकर, आरोग्य निरीक्षक यांनी तातडीने नदीकाठच्या खोलेश्वर भागात भेट देऊन घटनेची पाहणी केली. नदीकाठच्या लोकांनी तात्पुरता आपले बिºहाड हलवावे, असे आवाहन मनपा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. नदी काठी राहणाऱ्यांची तात्पुरता व्यवस्था महापालिका शाळा क्रमांक १ आणि २ मध्ये करण्यात आली आहे. हरिहरपेठमधील नागरी वसाहतीत राहणाºयांची व्यवस्थादेखील महापालिकेने केली आहे. २० आॅगस्टपर्यंत पाऊस पाण्याची स्थिती अशीच राहणार असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहनही महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. 

 

टॅग्स :AkolaअकोलाMorna Riverमोरणा नदी