शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाइन व्यवसाय परवानगीला ‘कॅट’चा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 17:14 IST

या निर्णयाविरुद्ध देशव्यापी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

- संजय खांडेकर

अकोला : कोरोनाच्या पृष्ठभूमीवर ग्राहक आणि व्यापारी यात सुरक्षित अंतर राहावे यासाठी केंद्र शासनाने २० एप्रिलपासून आॅनलाइन व्यावसायास अधिकृतपणे परवानगी देण्याचा निर्णय चालविला आहे. या निर्णयाचा ‘कॅट’( ने कॉन्फिडिरेशन आॅफ आॅल इंडिया फेडरेशनने) तीव्र शब्दात विरोध केला आहे. या निर्णयाविरुद्ध देशव्यापी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.संपूर्ण देश सध्या कोरोनाच्या महामारीशी संघर्ष करीत आहे. देशभरात सध्या लॉकडाउन करण्यात आले असून, दळणवळणासह संपूर्ण उद्योगधंदे बंद पडल्याने देशाची आर्थिक घडी विस्कटली आहे. नोकरदारापासून उद्योजक व्यापारी सर्वांनाच यात झळ पोहोचली आहे. व्यापाºयांनीदेखील सरकारला साथ देत मदतीचा हात पुढे केला आहे. शासनाने सर्वसामान्य माणसाला सवलती जाहीर केल्या; मात्र व्यापारी आणि लघू व्यावसायिकांना कोणतीही मदत जाहीर केली नाही. उलटपक्षी येत्या २० तारखेपासून परंपरागत व्यवसायाच्या विरुद्ध आॅनलाइन व्यावसाय अधिकृत करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी विशेष परवानगी दिली जात आहे. या निर्णयामुळे व्यापारी वर्गात प्रचंड असंतोष पसरला असून, त्यांनी सरकारच्या धोरणाचा जाहीर निषेध सुरू केला आहे. यामुळे स्वदेशीऐवजी विदेशी बहुराष्ट्रीय कंपन्यांना चालना मिळेल. आॅनलाइन डिलेव्हरी करणारा मुलगा संक्रमित नसेल, हे कोण ठरविणार, आदी अनेक प्रश्न यामुळे समोर आले आहेत. कॉन्फिडिरेशन आॅल इंडिया फेडरेशनच्या पदाधिकाºयांनी सरकारच्या या निर्णयावर कठोर टीका केली आहे.महाराष्ट्रातील ७ लाख आणि देशातील ७ कोटी व्यावसायिकांवर हा अन्याय आहे. या विरोधात कॅट सरकारच्या धोरणाविरुद्ध असहकार आंदोलन छेडेल. यासाठी लवकरच बैठक बोलाविली जाईल.- अशोक डालमिया, राष्ट्रीय सचिव, कॅट.

 

टॅग्स :Akolaअकोलाbusinessव्यवसाय