शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

चीन उत्पादित वस्तूंच्या बहिष्कारासाठी ‘कॅट’ राबविणार राष्ट्रीय मोहीम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 14:22 IST

अकोला: चीन उत्पादित वस्तूंवर भारतीयांनी बहिष्कार घालून पाकिस्तानला धडा शिकवावा, असे आवाहन राष्ट्रीय ‘कॅट’चे सचिव अशोक डालमिया यांनी केले असून, यासंदर्भात ‘कॅट’ राष्ट्रीय अभियान सुरू करीत असल्याची माहिती त्यांनी ‘लोकमत’ शी बोलतांना दिली आहे.

-  संजय खांडेकरअकोला: चीन उत्पादित वस्तूंवर भारतीयांनी बहिष्कार घालून पाकिस्तानला धडा शिकवावा, असे आवाहन राष्ट्रीय ‘कॅट’चे सचिव अशोक डालमिया यांनी केले असून, यासंदर्भात ‘कॅट’ राष्ट्रीय अभियान सुरू करीत असल्याची माहिती त्यांनी ‘लोकमत’ शी बोलतांना दिली आहे.पुलवामा येथे शहीद झालेल्या ४४ सीआरपीएफ जवानांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली द्यायची असेल, तर पाकिस्तानची चौफेर कोंडी करणे गरजेचे आहे. त्यासाठी पाकिस्तानला मदत करणाºयांनादेखील धडा शिकवावा लागेल. तेव्हाच ते पाकिस्तानला मदत करणे थांबवतील, असे ‘कॅट’चे मत आहे. ‘कॅट’चे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतिया यांच्या नेतृत्वात चीन उत्पादित वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मोहीम तीव्र केली जात आहे. चीन हा पाकिस्तानचा सर्वांत मोठा समर्थक असून, आर्थिकसह इतरही मदत तो पाकिस्तानला करीत असतो. दुसरीकडे चीनची संपूर्ण बाजारपेठ भारताच्या भरवशावर आहे. चीनची प्रत्येक वस्तू भारतात विकल्या जाते. जर आम्ही चीनच्या उत्पादित वस्तूंवर बहिष्कार घातला तर चीनची आर्थिक व्यवस्था कोलमोडण्याची शक्यता आहे. पर्यायाने त्याला पाकिस्तानची मदत थांबवावी लागेल. चीन आणि पाकिस्तान यांना धडा शिकविण्यासाठी भारतीयांनी चीन उत्पादित वस्तूंवर बहिष्कार घातला पाहिजे, असा सामाजिक संदेश देत कन्फेडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्स (कॅट)ने राष्ट्रीय अभियान सुरू केले आहे, अशी माहिती राष्ट्रीय ‘कॅट’चे सचिव अशोक डालमिया यांनी दिली आहे.कन्फेडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्स (कॅट)ने देशभरातील चीन निर्मित वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असून, हे अभियान राबविण्यासाठी मोहीम उघडली जात आहे. चीन निर्मित साहित्यावर बहिष्कार घालण्यासाठी मोर्चे काढून जनजागृती करण्याचादेखील कार्यक्रम आहे. सोबतच आगामी मार्चमध्ये येत असलेल्या होळीमध्ये चीन उत्पादित वस्तू जाळण्याचे आवाहन ‘क ॅट’तर्फे केले जाणार आहे. व्यापारी-उद्योजक नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होऊन अभियान यशस्वी करावे, असे आवाहन केले आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाbusinessव्यवसायchinaचीन