शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सात जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल

By admin | Updated: January 17, 2015 01:26 IST

मोरझाडीतील आत्महत्या प्रकरण.

उरळ (अकोला): नजीकच्या मोरझाडी येथील सामूहिक विष प्राशनाच्या प्रकरणात उपचराअंती वाचलेल्या मुलाच्या फिर्यादीवरून उरळ पोलिसांनी गावातील सात जणांविरुद्ध शुक्रवारी संगनमत करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.मोरझाडी येथील अनिल बाबाराव मोरखडे (५७), रेखा अनिल मोरखडे (४५), धीरज अनिल मोरखडे (२0), आधार ऊर्फ सूरज अनिल मोरखडे (१८) आणि प्रीती अनिल मोरखडे (१५) यांनी १ जानेवारी रोजी सकाळी त्यांच्या शेतामध्ये रोगर नामक विषारी औषध प्राशन केले. यातील रेखा अनिल मोरखडे यांचा २ जानेवारीला, अनिल मोरखडे यांचा ४ जानेवारी रोजी आणि त्यांचा धाकटा मुलगा आधार याचा ७ जानेवारी रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. धीरज आणि त्याची धाकटी बहीण प्रीती यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होऊन मृत्यूच्या दाढेतून त्यांची सुटका झाली. या प्रकरणी धीरजने शुक्रवारी उरळ पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गावातील हरिश्‍चंद्र पांडुरंग मोरखडे, देवका हरिश्‍चंद्र मोरखडे, मीनाबाई हरिश्‍चंद्र मोरखडे, दिगांबर देविदास मोरखडे, संगीता दिगांबर मोरखडे, देविदास पांडुरंग मोरखडे, चंद्रप्रभा देविदास मोरखडे या सात जणांविरुद्ध भादंविच्या कलम ३0६ व ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.धीरजने उरळ पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीनुसार , तो व त्याच्या कुटुंबीयांना गावातील उपरोक्त लोकांनी ह्यतुम्हाला गावात राहू देत नाहीह्ण, असे सांगून व त्यांची बदनामी करून अतोनात त्रास दिला. या त्रासाला कंटाळून कुटुंबीयांनी विष प्राशन केले होते. अनिल मोरखडे, रेखा मोरखडे व आधार मोरखडे यांच्या मृत्यूस उपरोक्त लोक कारणीभूत असल्याचे धीरजने फिर्यादीत नमूद केले. या प्रकरणी ठाणेदार पी. के. काटकर हे तपास करीत असून, अद्याप पोलिसांनी कुणालाही अटक केलेली नाही. तथापि, आरोपींना आपण लवकरच अटक करू, अशी माहिती ठाणेदार काटकर यांनी प्रस्तुत वार्ताहराला दिली. ह्यत्याह्ण चिठ्ठीचे रहस्य कायमच मोरखडे कुटुंबीयाच्या विष प्राशनानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक मीणा यांनी मोरझाडी येथे भेट देऊन घराची झडती घेतली होती. तेथे एक चिठ्ठी आढळून आली होती. त्या चिठ्ठीत काय लिहिलेले होते, त्याबाबत पोलिसांनी मौन पाळले होते. आता या प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतरही त्या चिठ्ठीचे रहस्य कायमच आहे, हे विशेष.