शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

विनयभंग प्रकरणात अकाेट बीडीओविरुद्ध गुन्हा दाखल; महिलेची रामदास पेठ पाेलिसांत तक्रार

By आशीष गावंडे | Updated: June 20, 2024 21:27 IST

महिला ग्रामसेविकेच्या तक्रारीनुसार हिंगाेली जिल्ह्यातील कळमनुरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी लिंबाजी बारगिरे यांच्याविराेधात गुन्हा दाखल.

अकोला: जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे प्रभारी उपमुख्य कार्यकारी तथा अकाेट पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कालीदास तापी यांच्याविराेधात महिला ग्रामसेविकेचा विनयभंग केल्या प्रकरणी रामदासपेठ पोलिसांनी गुरुवारी गुन्हा दाखल केला. एकाच प्रकरणात दाेन गटविकास अधिकाऱ्यांविरुध्द विनयभंगाचा गुन्हा झाल्यामुळे जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

४६ वर्षीय महिला ग्रामसेविकेच्या तक्रारीनुसार हिंगाेली जिल्ह्यातील कळमनुरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी लिंबाजी बारगिरे यांच्याविराेधात १५ जून राेजी रामदास पेठ पाेलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. आता याप्रकरणी अकाेट पं.स.मध्ये गटविकास अधिकारी पदावर कार्यरत तथा जिल्हा परिषदेत सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा अतिरिक्त प्रभार पाहणारे कालीदास तापी यांच्याविराेधात संबंधित महिला ग्रामसेविकेच्या तक्रारीनुसार विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीच्या तक्रारीनुसार तापी यांनी जिल्हा परिषदेच्या कार्यालयात तसेच अकाेट येथील पंचायत समिती कार्यालयात विनयभंग केला. याप्रकरणी प्राप्त तक्रारीनुसार रामदास पेठ पाेलिसांनी गुरुवारी ३५४ अ,आणि ३५४ ड नुसार गुन्हा दाखल करुन तापी यांना नाेटीस जारी केली आहे. 

घटनास्थळ सिटी काेतवाली तरीही...दरम्यान, फिर्यादीच्या तक्रारीनुसार जिल्हा परिषद कार्यालयात विनयभंग घडला. सदर कार्यालय सिटी काेतवाली पाेलिसांच्या हद्दीत येत असल्यामुळे फिर्यादीने सिटी काेतवाली पाेलिस ठाण्यात तक्रार देणे क्रमप्राप्त हाेते. परंतु फिर्यादी महिला रामदास पेठ पाेलिस ठाण्यातच तक्रार देण्यावर ठाम असल्यामुळे याप्रकरणी पाेलिस निरीक्षक मनाेज बहुरे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेतले. वरिष्ठांच्या निर्देशानुसार रामदास पेठ पाेलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया केली. 

टॅग्स :Molestationविनयभंग