शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

सावकारी प्रकरणात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

By admin | Updated: January 26, 2017 10:38 IST

उरळ पोलिसांनी हातरुण, जुना अंदुरा, खिरपुरी व अकोला येथील एकूण आठ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.

उरळ (अकोला), दि. २५-: नजीकच्या हातरुण, जुना अंदुरा व निमकर्दा येथील चार शेतकर्‍यांची शेतजमीन गहाण व्यवहाराच्या नावाखाली हडप केल्याच्या तक्रारप्रकरणी बाळापूर येथील सहायक निबंधक (सहकारी संस्था) यांच्या लेखी पत्रावरून त्यांच्याच कार्यालयातील सहायक सहकारी अधिकारी दिलीप दामोदर गोपनारायण यांनी चौकशी अंती दाखल केलेल्या तक्रारीवरून उरळ पोलिसांनी हातरुण, जुना अंदुरा, खिरपुरी व अकोला येथील एकूण आठ आरोपींविरुद्ध महाराष्ट्र सावकारी अधिनियम २0१४ च्या ३९ कलमान्वये २४ जानेवारी रोजी गुन्हा दाखल केला आहे.हातरूण येथील कलंदरखा एजाजखा रा.हातरुण, फुलचंद जयदेव पाटील रा. जुना अंदुरा, दुर्गाबाई माणिक तायडे रा.जुना अंदुरा व गजानन भुलाजी इंगळे रा. निमकर्दा यांनी त्यांची जमीन सावकारांनी हडपल्याबाबत दाखल केलेल्या तक्रारीवरून बाळापूरचे सहायक निबंधक (सहकारी संस्था ) यांच्या लेखी पत्रावरून सहायक सहकारी अधिकारी दिलीप गोपनारायण यांनी याप्रकरणी चौकशी केली. त्या चौकशीत शेतजमीन गहाण प्रकरणात अवैध सावकारी व्यवहार झाला असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून दिलीप गोपनारायण यांनी सिलेमानशाह तुरकशाह रा. हातरुण, मोहसीनशाह लुकमानशाह रा. हातरूण , गजानन लक्ष्मण काळे रा. शुक्रवारपेठ वाशिम, केशव तुळशिराम भगत रा. जुना अंदुरा, देवीदास भीमराव उबाळे रा. खिरपुरी, सुनील जयंतराव बावस्कर रा. अकोला, विजयकुमार मायाप्रसाद तिवारी रा. अकोला व नरेंद्र प्रमोद पंचाली रा. अकोला या आठ आरोपींविरुद्ध २४ जानेवारीपूर्वी अवैध सावकारी व्यवहार केला असल्याबाबत उरळ पोलीस स्टेशनमध्ये २४ जानेवारी रोजी रीतसर तक्रार दाखल केली. त्या तक्रारीवरून उपरोक्त आठही आरोपींविरुद्ध उरळ पोलिसांनी महाराष्ट्र सावकारी अधिनियमाच्या कलम ३९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. उरळचे ठाणेदार सोमनाथ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार संजय कुंभार, जमादार दादाराव लिखार, पोलीस नाईक विजय चव्हाण, एएसआय हरिदास काळे हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.