शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
2
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
3
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
4
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
5
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
6
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
7
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
8
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
9
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
10
जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघे जखमी
11
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
12
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
13
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
14
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
15
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
16
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
17
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
18
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
19
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
20
आदिवासी भागातून UPSC परीक्षेत यश मिळवणारे पहिलेच युवक; इंटरनेटवरील व्हिडीओद्वारे केला अभ्यास

सतरंजी उद्योगावर अवकळा; बेरोजगारी वाढली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 13:00 IST

पाच वर्षांकरिता विस्थापित होऊन नंतर स्थलांतरित झाल्याने आजपर्यंत एकही उद्योग या मतदारसंघात आणला नाही.

- विजय शिंदे  लोकमत न्यूज नेटवर्कअकोट: अकोट शहरात संतरज्या बनविण्याचा प्रसिद्ध उद्योग होता. या ठिकाणाहून राज्यात संतरज्या जात होत्या. तो उद्योग बंद झाला. अनेक बेरोजगार झाले. अनेक बाहेरचे उमेदवार आले. आमदार झाले. पाच वर्षांकरिता विस्थापित होऊन नंतर स्थलांतरित झाल्याने आजपर्यंत एकही उद्योग या मतदारसंघात आणला नाही. त्यामुळे बेरोजगारी भरमसाट वाढल्याने आगामी निवडणुकीत स्थानिक उमेदवारीच्या मुद्यावर भर दिल्या जात आहे.अकोट मतदारसंघात राज्यातून लोक येतात. आमदार बनण्यासाठी, सोयीचे राजकारण करतात आणि पाच वर्षांसह कायमस्वरूपी कुटुंबाची सोय करून घेतात. अखेर स्थानिक युवक बेरोजगार राहतो. कार्यकर्ते फक्त संतरज्या उचलण्यात धन्यता मानतात. ना स्वाभिमान, ना स्वत:ची ना आपल्या मुलांच्या भवितव्याची चिंता अशा विविध पक्ष, संघटनेचे कार्यकर्ते अल्पसंतुष्ट बनलिले गेले आहेत. अकोट मतदारसंघात संतरज्यांचा उद्योग जुनाच आहे. फक्त आयात-निर्यात धोरण बदलले आहे; पंरतु आता मानसिकता बदलायला लागल्याचे दिसते. त्यामुळे स्थानिकची मागणी जोर धरत असल्याने कोणता पक्ष स्थानिक कार्यकर्त्याला आमदार बनविणार की संतरज्या उचलण्याकरिता वापर करणार, हे लक्षवेधक ठरणार आहे. कित्येकदा स्थानिक आमदार झाला; पण सत्ता नव्हती. जेव्हा सत्ता आली तर स्थानिक आमदार नव्हता. तरीपण स्थानिक बेरोजगारी दूर करण्यासाठी एकही उद्योग, धंदा, शासनाच्या योजनेतून अर्थसाहाय्य मिळू शकले नाही, हे वास्तव आहे. एमआयडीसीमध्येसुद्धा पाहिजे असे उद्योग उभे राहिले नाही. उलट अनेक लोकप्रतिनिधींनी आपल्या विश्वासातल्या माणसांना उद्योजकांच्या रांगेत बसवून दिले; परंतु मतदारसंघातला बेरोजगार युवक हा बेरोजगार राहिला असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आगामी विधानसभेत मतदारांनी बेरोजगारीचा मुद्दा व कार्यकर्त्यांनी लावून धरलेल्या मुद्यावर लक्ष केंद्रित केले. बेरोजगारी व स्थानिक उमेदवारीचे समीकरण राजकीय समीकरणावर रामबाण उपाय ठरला, तर संतरज्या बनविण्यासारखे अनेक उद्योग या मतदारसंघात येऊ शकतात, हे उघड सत्य आहे.

टॅग्स :akotअकोटAkolaअकोला