शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मालवाहू वाहनाची भारक्षमता ११ टक्क्यांनी वाढविली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 13:34 IST

अकोला : केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे महाराष्ट्राने माल वाहतूक करणाऱ्या वाहनांची भारवाहन क्षमता अर्थात अ‍ॅक्सल लोड सरासरी ११ टक्क्यांनी वाढविली आहे.

ठळक मुद्देराज्य शासनाने ६ आॅगस्ट रोजी निर्गमित केलेल्या या महत्त्वपूर्ण परिपत्रकामुळे राज्याच्या ट्रान्सपोर्ट इंडस्ट्रीजला दिलासा मिळाला. दंडात्मक कारवायांवर ब्रेक लागणार असून, दरमहा वसूल होणारा कोट्यवधींचा महसूल बुडणार आहे.

- संजय खांडेकरअकोला : केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे महाराष्ट्राने माल वाहतूक करणाऱ्या वाहनांची भारवाहन क्षमता अर्थात अ‍ॅक्सल लोड सरासरी ११ टक्क्यांनी वाढविली आहे. याची अंमलबजावणी लवकरच राज्यात सुरू होणार आहे. यामुळे उपप्रादेशिक परिवहन खात्याकडून क्षमतेपेक्षा जादा वाहतूक करणाºया (ओव्हरलोड) वाहनांवर केल्या जाणाºया दंडात्मक कारवायांवर ब्रेक लागणार असून, दरमहा वसूल होणारा कोट्यवधींचा महसूल बुडणार आहे.माल वाहतूक करणाºया वाहनांची भारवाहन क्षमता वाढविण्याबाबत महाराष्ट्र राज्य शासनाने ६ आॅगस्ट रोजी निर्गमित केलेल्या या महत्त्वपूर्ण परिपत्रकामुळे राज्याच्या ट्रान्सपोर्ट इंडस्ट्रीजला दिलासा मिळाला असून, त्यांना मोठा लाभ होणार आहे. डीझल दरवाढ, थर्डपार्टी इन्श्यूरन्स आणि ई-वे बिलिंगच्या संदर्भात शासन धोरणावर टीका करीत माल वाहतूक व्यावसायिकांनी गेल्या महिन्यात पाच दिवसांचे चक्काजाम आंदोलन केले होते. या आंदोलकांना केंद्र शासनाने माल वाहतुकीच्या नियमावलीत बदल केला जाईल, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार भारवाहन क्षमता (अ‍ॅक्सल लोड) सरासरी ११ टक्क्यांनी वाढविली आहे. तसे निर्देश राज्यांना दिले असून, आता त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

असा बुडेल कोट्यवधींचा महसूल!उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्फे ओव्हरलोड वाहतूक करणाºया वाहनांवर कारवाईमध्ये प्रत्येक जिल्हा स्तरावर दरमहा सरासरी ८ ते १० लाख रुपयांचा महसूल गोळा होतो. अकोल्यासारख्या ठिकाणचा एका वर्षाचा महसूल जवळपास सव्वा कोटी रुपयांचा होता. राज्याची आकडेवारी काढली, तर ती हजारो कोटींच्या घरात जाते. या कारवाया बंद होताच हा कोट्यवधींचा महसूलही बंद होईल.-अ‍ॅक्सल लोड क्षमतेबाबतचे सुधारित नोटिफिकेशन ६ आॅगस्ट रोजी आले आहे. नव्या मॉडेल वाहनांना क्षमता चाचणीतून जावे लागेल. १६ जुलैपर्यंत पासिंग झालेल्या मोटर वाहनांना वाढीव क्षमतेचा परवाना दिला जाईल; मात्र आरसी बुकमध्ये नोंद करणे बंधनकारक आहे. अतिरिक्त क्षमतेच्या मालावर करभरणा करावा लागेल.-विनोद जिचकार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, अकोला.

-अ‍ॅक्सल लोड क्षमता वाढविण्याचा शासनाचा निर्णय स्वागतार्ह आहे. यातून ट्रान्सपोर्ट इंडस्ट्रीजला फायदा होणार आहे. राष्ट्रीय आणि महामार्गावरील वाहतूकही कमी होईल. सोबतच यापुढे ओव्हरलोडच्या नावावर होणाºया कारवाया बंद होतील.-नीलेश भानुशाली, सदस्य ट्रान्सपोर्ट असोसिएशन, अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोलाroad transportरस्ते वाहतूक