शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

कार चालवणे आले अंगलट; गोरक्षण रोडवर अपघात

By admin | Updated: May 17, 2017 02:43 IST

अकोला: जुन्या आरटीओ कार्यालयासमोर गॅरेजवर उभी असलेली कार नजरा चुकवून मुलांनी सुरू केली.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जुन्या आरटीओ कार्यालयासमोर गॅरेजवर उभी असलेली कार नजरा चुकवून मुलांनी सुरू केली. ही कार त्यांनी दामटत गोरक्षण रोडवर आणण्याचा प्रयत्न केला; मात्र कारवरील नियंत्रण सुटल्याने ही कार पूजा कॉम्लेक्सच्या ग्राउंड फ्लोअरमध्ये जाऊन पडली. यात तीन मुले किरकोळ जखमी झाले. जर कार डीपीवर जाऊन आदळली असती तर मोठा जीवघेणा प्रसंग उद्भवला असता. ही घटना मंगळवारी दुपारी ३ वाजता घडली.अनेक दिवसांपासून तीन अल्पवयीन मुलांना एक कार गॅरेजवर उभी दिसत होती. ही कार आपण चालवूनच पाहू, असा मोह त्यांना झाला असावा. त्यानुसार गॅरेजमध्ये कुणीही नसल्याचे पाहून मुले कारमध्ये बसले व कार सुरू केली. कार सुरूही झाली. त्यानंतर त्यांनी गोरक्षण रोडकडे कार चालवत आणली; मात्र वाहन चालवण्यासाठी मुलांचा हात साफ नसल्याने पूजा कॉम्प्लेक्ससमोर वाहन चालवणाऱ्या मुलाकडून कारचा वेग अचानक वाढला अन् याला काही समजण्याच्या आतच कार डीपीच्या १० फूट मागे पूजा कॉम्प्लेक्सच्या खाली जाऊन आदळली; मात्र मुलांना फारसे काही लागले नाही. एक जण किरकोळ जखमी झाला. लगेच गॅरेज मालकाला अपघाताची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोहचला. आपण या तिन्ही मुलांना कधी पाहिले नाही किंवा त्यांना ओळखण्याचा प्रश्नच नाही, असे त्यांनी सांगितले. शेवटी गॅरेजमालकाने खदान पोलिसात धाव घेऊन अपघाताची माहिती दिली. मुले ही कार घेऊन काय करणार होती किंवा कार कुठे नेणार होते, याबाबत तपास करीत आहेत.नशीब बलवत्तर म्हणून...अपघात एवढा भीषण होता की कार कॉम्प्लेक्सच्या खाली आदळल्याने कॉम्प्लेसच्या पायऱ्या तुटल्या व कारच्या समोरच्या काचा फुटल्या; मात्र तिघेही कारमध्येच अडकल्याने त्यांना फारसे लागले नाही; मात्र हीच कार जर समोर असलेल्या डीपीला धडकली असती मोठा बर्निंग थरार झाला असता. या ठिकाणी उपस्थित मुलांचे नशीब बलवत्तर अशी चर्चा करीत होते.