अकोला, दि. ८: अकोला महान रोडवरील बाश्रीटाकळीनजीकच्या एका अरुंद पुलावरून कार नदीत कोसळल्याची घटना रविवारी घडली. या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर अकोला येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येत आहेत.अकोल्यातील मोठी उमरी येथील रहिवासी रुपेश ठाकूर व त्यांचे मित्र एम एच ३0 एल ६५७0 क्रमांकाच्या कारने महान येथे जात होते. दरम्यान, बाश्रीटाकळीनजीक असलेल्या एका नदीच्या अरुंद पुलावरून त्यांची कार जात असतानाच ती कार पुलावरून सिनेस्टाईल खाली कोसळली. दोन पलट्या मारुन कार नदीत कोसळली. यामध्ये ठाकूर व त्यांचे मित्र गंभीर जखमी झाले. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची माहिती मिळताच बाश्रीटाकळी पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. त्यानंतर दोन क्रेनच्या साहाय्याने ही कार काढण्याचे कामकाज तब्बल पाच तास सुरू होते.
अरुंद पुलावरून कार नदीत कोसळली
By admin | Updated: August 9, 2016 02:34 IST