अकोला : रामदासपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मुसा कॉलनी येथील रहिवासी एक युवक त्याच्या राहत्या घरातून गांजा चरस व इतर अमली पदार्थांची मोठ्या प्रमाणात अवैधरित्या विक्री करीत असल्याच्या माहितीवरून रामदासपेठ पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशिरा छापा टाकला. या ठिकाणावरून ११०० ग्राम गांजा व चरस जप्त करण्यात आली आहे.
मुसा कॉलनी येथील रहिवासी फैजान खान लतीफ खान वय 20 वर्ष हा त्याच्या राहत्या घरातून अमली पदार्थांची विक्री करीत असल्याची माहिती रामदासपेठ पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी त्याच्या घरात छापा टाकून घरातून अकराशे ग्राम गांजा व 70 ग्राम चरस जप्त केली. या प्रकरणी आरोपी विरुद्ध एनडीपीएस ऍक्ट अन्वय रामदासपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक जी श्रीधर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मोनिका राऊत, शहर पोलिस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली रामदास पेठचे ठाणेदार गजानन गुल्हाने, पीएसआय संदीप मडावी, प्रशांत इंगळे, किशोर गवळी, शेख हसन, तोहिद अली काझी, अन्सार, संजय आकोटकर, गजानन खेडकर, श्रीकांत पातोंड, स्वप्निल चौधरी, विशाल चव्हाण, शिव कुमार दुबे, अमोल शिरसाट व महिला पोलीस अंमलदार दिपाली अग्रवाल यांनी केली. यापूर्वीही या परिसरातून मोठ्या प्रमाणात गांजा विक्री करीत असल्याच्या माहितीवरून पोलिस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने गांजा जप्त केला आहे. त्यावरून शहरात गांजा चरस यासह विविध अंमली पदार्थांची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचे दिसून येत आहे.