शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
2
"56 इंचाची छाती असून, अमेरिकेपुढे झुकतात", राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा
3
युक्रेनकडून रशियावर भीषण ड्रोनहल्ला, तुआप्से बंदरात घडवला मोठा विध्वंस, ऑईल टर्मिलन जळाले  
4
PM किसानचा २१वा हप्ता कधी येणार? मोठी अपडेट समोर! 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाहीत २००० रुपये
5
‘सत्याचा मोर्चा’त शरद पवारांचे विधान; शिंदे गटाचे नेते म्हणाले, “५० वर्ष सत्ता भोगली...”
6
“अजित पवार, शेतकऱ्यांनी जीवन संपवावे असे वाटते का तुम्हाला?”; प्रकाश आंबेडकरांचा सवाल
7
मुंबईतील कॉन्सर्टवेळी 'मिस्ट्री मॅन'सोबत दिसली मलायका अरोरा, नेटकरी म्हणाले, "अर्जुनपेक्षा भारी..."
8
"मोदी आणि अमित शाह यांना तर हरवू शकत नाहीत, म्हणून..."; खर्गेंच्या संघावरील बंदीच्या मागणीवर बाबा रामदेव यांची तिखट प्रतिक्रिया
9
IND-W vs SA-W Final : टॉस आधी पावसाची बॅटिंग! मेगा फायनलमध्ये ५०-५० षटकांचा खेळ होणार का?
10
रेखा झुनझुनवाला यांची हिस्सेदारी असलेल्या कंपनीला मोठी ऑर्डर; शेअर्स रॉकेट वेगाने धावणार?
11
तंत्रज्ञानाची किमया! चित्रपट पाहत असताना...; Apple वॉचमुळे वाचला २६ वर्षीय तरुणाचा जीव
12
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
13
आर्थिक व्यवहारावरून वाद, राष्ट्रवादीच्या नेत्याने रोखली शिंदे सेनेच्या नेत्यावर बंदूक
14
Crime: कुटुंबासाठी काळ ठरला नवरा; बायको मुलीसह नातेवाईकाचा विळ्याने चिरला गळा, कारण काय?
15
तुमच्या बचतीवर बक्कळ नफा! ही घ्या ३ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांची यादी
16
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
17
पत्नीला द्यायचं होतं सरप्राइज, पानवाल्याने जमवली १ लाखाची नाणी, सोनाराकडे गेला, त्यानंतर...   
18
Video - अडीच वर्षांचा मुलगा खेळताना आली स्कूल व्हॅन अन्...; काळजात चर्र करणारी घटना
19
तुमच्या जुन्या बँक खात्यात पैसे विसरलात का? RBI ने सांगितला फक्त ३ स्टेप्सचा सोपा मार्ग
20
नात्याला काळीमा ! दीराने वहिनीचे दोन्ही हात पकडून ठेवले अन् पतीने कापला गळा...

शहरात सामसूम; ग्रामीण भागात बैठका, दौऱ्यांचा सपाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 15:44 IST

महापालिका क्षेत्रात अद्यापही राजकीय पटलावर सामसूम दिसत असून, आयपीएल क्रिकेट सामन्यांमुळे प्रचार प्रभावित झाल्याचे बोलल्या जात आहे.

अकोला: लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला १३ दिवसांचा कालावधी शिल्लक असताना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप-शिवसेना व वंचित बहुजन आघाडीने ग्रामीण भागात दौरे, बैठकांचा सपाटा लावल्याचे चित्र आहे. महापालिका क्षेत्रात अद्यापही राजकीय पटलावर सामसूम दिसत असून, आयपीएल क्रिकेट सामन्यांमुळे प्रचार प्रभावित झाल्याचे बोलल्या जात आहे. पक्षाचा आत्मा अशी ओळख असणारे तरुण कार्यकर्ते क्रिकेट सामन्यांत दंग असल्याने राजकीय पक्षांच्या डोकेदुखीत वाढ झाल्याची चर्चा आहे.अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक रिंगणात भाजप-शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीने एकमेकांविरोधात दंड थोपटले आहेत. तीनही पक्षांच्या उमेदवारांनी ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागातील जनतेच्या भेटीगाठी घेणे, कॉर्नर बैठकांच्या माध्यमातून मतदानासाठी जनजागृती करणे व पक्षाची ध्येयधोरणे समजावून सांगण्यासाठी मागील सहा महिन्यांपासूनच भाजप व वंचित बहुजन आघाडीने पुढाकार घेतल्याचे चित्र होते. जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला पिंजून काढण्यात या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर व उमेदवारी अर्ज सादर केल्यानंतरही संबंधित राजकीय पक्षांनी ग्रामीण भागालाच प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे. कॉर्नर बैठका, प्रचार कार्यालयांचे उद्घाटन धडाक्यात सुरू आहे. त्या तुलनेत शहरात मात्र सामसूम असून, प्रचार, बैठका किंवा सभांचा कोठेही मागमूस नसल्याचे चित्र समोर आले आहे.उन्हामुळे मतदारही भेटेनातएप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यांत उन्हाचा पारा ४२ अंशाच्या पार गेला आहे. सूर्यनारायण आग ओकू लागल्यामुळे निवडणूक रिंगणातील उमेदवारांना मतदारही भेटत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे सकाळी ११ पर्यंत व सायंकाळी ६ नंतर मतदारांच्या गाठीभेटी घेण्याचे नियोजन राजकीय पक्षांकडून केल्या जात असल्याची माहिती आहे.खर्च बचतीचा उपाय सापडला!उन्हाची वाढलेली तीव्रता त्यातच क्रिकेट सामन्यांची पडलेली भर लक्षात घेता शहरात मतदारांसह राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्येही निवडणुकीबद्दल फारसा उत्साह नसल्याचे चित्र आहे. नेमक्या याच परिस्थितीचा फायदा घेत काही राजकीय पक्षांना खर्चाच्या बचतीचा उपाय सापडल्याची खमंग चर्चा शहरात रंगली आहे. तर पक्षाकडूनही खर्च होत नसल्याने काम कसे करायचे, असा सवाल कार्यकर्ते उपस्थित करीत आहेत.

क्रिकेट सामन्यांमुळे डोकेदुखीऐन लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आयपीएल क्रिकेट सामने रंगात आले आहेत. बोटावर मोजता येणारे कार्यकर्ते वगळल्यास बहुतांश कार्यकर्ते क्रिकेटचे सामने पाहण्यात दंग असल्याचे चित्र आहे. यामुळे शहरी भागात बैठका घेणे, प्रचार करणे तूर्तास तरी अवघड झाले असून, यामुळे राजकीय पक्षांची डोके दुखी वाढल्याचे बोलल्या जात आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक