शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश, हाती पैसा येईल; चांगली बातमी मिळेल
3
ना शिधा, ना आनंद! भुजबळांनी ते धाडस दाखविले...
4
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
5
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
6
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
7
ईडी कारवाई: वसईचे माजी आयुक्त अनिल पवार, गुप्ताची ७१ कोटींची मालमत्ता जप्त
8
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर
9
माओवादी चळवळीने हात टेकले; ‘भूपती’सह ६० जणांची शरणागती
10
इंधन भेसळ प्रकरणात जामीन देताना गंभीरतेने विचार गरजेचा; मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत, एकाचा जामीन फेटाळला
11
कोल्डरिफसह तीन विषारी सिरप वापरू नका, जिवाला असलेला धोका टाळा
12
धारदार शस्त्राने गळा चिरून तरुणाची हत्या; इतर मद्यपींनी पाहिले अन् तिकडे धाव घेतली...
13
सलमान, शाहरूखला पाहण्यास गाठली मुंबई; अनाथ मुलाचा उपाशीपोटी तब्बल २५ तासांचा प्रवास
14
एमबीबीएस प्रवेशासाठी १५२ विद्यार्थ्यांकडून चुकीची कागदपत्रे सादर; सीईटी सेलची नोटीस
15
रणजी करंडक स्पर्धेमध्ये छाप पाडण्यासाठी युवा खेळाडू सज्ज; ऋषभ पंतच्या पुनरागमनावर नजर 
16
भारताने केलेे २-० ने ‘क्लीन स्वीप’; दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजवर ७ गडी राखून मात
17
कवितेच्या सूर्यकुळाचे नायक तुम्हीच आहात, सुर्वे !
18
महाराष्ट्र उच्च शिक्षणाचे जागतिक केंद्र कसे बनेल?
19
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
20
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?

प्लास्टिकमुक्तीसाठी अकोला जिल्ह्यात मोहिम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 13:11 IST

महान येथे प्लास्टिकमुक्तीसाठी किराणा दुकानांमध्ये डस्टबिन ठेवण्याचे बजावण्यात आले.

अकोला: ग्रामीण भागात प्लास्टिकमुक्ती करण्यासोबतच स्वच्छतेसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या निर्देशानुसार गावांमध्ये विविध उपक्रम राबवले जात आहेत. बाळापूर, पातूर, बार्शीटाकळी पंचायत समिती अंतर्गत गावांमध्ये अधिकाऱ्यांनी भेटी देत विविध सूचना दिल्या. त्यामध्ये महान येथे प्लास्टिकमुक्तीसाठी किराणा दुकानांमध्ये डस्टबिन ठेवण्याचे बजावण्यात आले.बार्शीटाकळी, पातूर, बाळापूर पंचायत समितीमधील गावांमध्ये अधिकाऱ्यांनी भेटी देऊन ग्रामसेवकांना हगणदरीमुक्त टप्पा क्रमांक दोन, ग्रामपंचायतीची पडताळणी, शाश्वत स्वच्छता आराखडा, स्वच्छताग्रही मानधन, प्लास्टिक गोळा करणे, याबाबत सूचना देण्यात आल्या. यावेळी जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे सनियंत्रण व मूल्यमापन तज्ज्ञ राहुल गोडले, समाजशास्त्रज्ञ शाहू भगत तसेच बार्शीटाकळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किशोर काळपांडे, सहायक गटविकास अधिकारी दिलीप शिरसाट, विस्तार अधिकारी रमेश चव्हाण, दिनेश इंगळे, सुरेश मानकर, सतीश ठोंबरे व ग्रामसेवक सभेला उपस्थित होते.तसेच बाळापूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी समाधान वाघ, विस्तार अधिकारी देशमुख, पंकज गवई, दीपाली महल्ले व ग्रामसेवक सभेला उपस्थित होते.ग्रामपंचायत महान येथे प्लास्टिक निर्मूलन मोहीम व मतदान जाणीव जागृती कार्यक्रम राबविण्यात आला. प्रत्येक दुकानदाराला प्लास्टिक व इतर कचºयासाठी डस्टबिन ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. परिसरातील प्लास्टिक गोळा करण्यासाठी माधुरी सरोदे, सरपंच यास्मिन परवीन, केंद्रप्रमुख गोकुलदास महल्ले, ग्रामसेवक डोगरे, मुख्याध्यापक मोहन तराळे, शफिक राहील, शिक्षक शाहीद इक्बाल खान, रउल्ला खान, सचिन जानोरकर, तन्वीर, इम्रान व शिक्षक, अंगणवाडी सेविका यांनी सहभाग घेतला.

टॅग्स :AkolaअकोलाPlastic banप्लॅस्टिक बंदी