शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पीक नुकसानाचा अंतिम अहवाल सहा दिवसांत मागितला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 11:58 IST

पीक नुकसानाचा अंतिम अहवाल ६ नोव्हेंबरपर्यंत सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : परतीच्या पावसाने जिल्ह्यात पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यानुषंगाने पीक नुकसानाचे पंचनामे तातडीने पूर्ण करून पीक नुकसानाचा अंतिम अहवाल सहा दिवसांत (६ नोव्हेंबरपर्यंत) सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्ह्यातील तहसीलदार, गटविकास अधिकारी (बीडीओ) व तालुका कृषी अधिकाऱ्यांना शुक्रवार, १ नोव्हेंबर रोजी दिला.पावसाळा संपल्यानंतर सतत सुरू असलेल्या परतीच्या पावसाने जिल्ह्यात खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. कापणीला आलेल्या आणि कापणी झालेल्या सोयाबीन व ज्वारीचे पीक सडले असून, कोंब फुटले आहेत. तसेच वेचणीला आलेला कापूस भिजला असून, कपाशीच्या बोंड्या सडल्या आहेत. पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने पळविला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. त्यानुषंगाने गत जुलै ते आॅक्टोबर अखेरपर्यंत अतिवृष्टी, पूर व परतीच्या पावसाने जिल्ह्यातील पीक नुकसानाचे पंचनामे तलाठी, ग्रामसेवक व कृषी सेवकांच्या पथकांद्वारे गत ३० आॅक्टोबरपासून सुरू करण्यात आले आहेत. पीक नुकसानाचे पंचनामे तातडीने पूर्ण करून, पीक नुकसानाचे पंचनामे तातडीने पूर्ण करून, पीक नुकसानाचा अंतिम अहवाल ६ नोव्हेंबरपर्यंत सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्ह्यातील सातही तहसीलदार, पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकाºयांना दिला.

पीक नुकसानाचे अर्ज घ्या; पथकांना निर्देशपीक विमा काढलेल्या शेतकºयांकडून पीक नुकसानाचे सूचना अर्ज तालुका कृषी अधिकारी कार्यालयात स्वीकारण्यात येत आहेत; मात्र पीक नुकसानाचे सूचना अर्ज शेतकºयांना सादर करणे सोयीचे व्हावे, यासाठी पीक नुकसानाचे पंचनामे करणाºया तलाठी, ग्रामसेवक व कृषी सेवकांच्या पथकांनी गाव पातळीवरच शेतकºयांकडून पीक नुकसानाचे सूचना अर्ज घ्यावे, असे निर्देशही जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत.

जिल्ह्यातील पीक नुकसानाचा अंतिम अहवाल ६ नोव्हेंबरपर्यंत सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकाºयांनी जिल्ह्यातील तहसीलदार, ‘बीडीओ’ व तालुका कृषी अधिकाºयांना दिला आहे. तसेच पीक विमा काढलेल्या शेतकºयांकडून पीक नुकसानाचे सूचना अर्ज पंचनामे करणाºया पथकांनी स्वीकारण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.-संजय खडसे,निवासी उपजिल्हाधिकारी.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीAkolaअकोला