शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

खरेदीदार थेट शेतात!

By admin | Updated: October 18, 2014 23:29 IST

बटाट्याची करार शेती: अकोल्यात पहिले खरेदीदार-विक्रेते संमेलन.

अकोला: वर्‍हाडातील शेतकरी करार शेतीच्या माध्यमातून बाजारभिमूख व्यवस्थापनाच्या दिशेने वाटचाल करीत असून, करार शेती अंतर्गत उत्पादित बटाट्याला वाजवी दर मिळावे, यासाठी महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास (एमएसीपी) प्रकल्पांतर्गत केल्या जात असलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, शनिवारी अकोला येथे खरेदीदार व विक्रे त्यांचे पहिले संमेलन पार पडले.उत्पादित कृषी मालाची विक्री कार्यक्षम होण्याकरिता खरेदीदार-विक्रेता संमेलनाद्वारे समन्वय साधण्याचा हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे. बदलत्या तंत्रज्ञानामुळे विक्री व्यवस्था क्लिष्ट होत असून, ग्राहकांची मागणी दिवसेंदिवस बदलत आहेत. या पार्श्‍वभूमीवर विविध कंपन्यासोबत संयुक्त उपक्रम राबवून नवीन जाळे विणण्याचा ह्यएमएसीपीह्णचा प्रयत्न आहे. खरेदीदार-विक्रेता संमेलनाच्या माध्यमातून व्यापाराच्या नवीन संधी उपलब्ध करण्यावर खर्‍या अर्थाने भर देण्यात आला. या प्रकल्पांतर्गत वर्‍हाडात शंभर पेक्षा जास्त उत्पादक कंपन्याची स्थापना झाली असून, एकट्या अकोला जिल्हय़ातच १४ उत् पादक कंपन्या स्थापण्यात येत आहेत. खासगी उद्योजक कंपन्याबरोबर पूर्व हमीभाव किंवा उत्पादन आधारीत भाव देऊन, करार पध्दतीने कृषी माल खरेदी करण्यासाठी शेतकरी उत् पादक कंपन्यांची या माध्यमातून सांगड घालण्यात येत आहे. अकोला व बुलडाणा जिल्हय़ात बटाट्याची करार शेती केली जात असून, अकोला जिल्हय़ा त यंदा प्रथमच रब्बी हंगामात ४0 हेक्टरच्यावर बटाटा लागवड करण्यात येणार आहे. प्रामुख्याने पातूर व बार्शिटाकळी तालुक्यातील शेतकर्‍यांनी बटाटा पिक लागवडीवर भर दिला आहे. याकरिता या शेतकर्‍यांनी एका खासगी कंपनीशी करार केला आहे.