शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

दहा टक्के मर्यादेतच औषध खरेदी करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 12:39 IST

नियमबाह्य औषध खरेदी केल्यास होणाऱ्या नुकसानाला संबंधित संस्था प्रमुख जबाबदार राहणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने स्पष्ट केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : आपत्कालीन स्थितीत औषध किंवा सर्जिकल साहित्य खरेदीसाठी शासकीय रुग्णालयांना मंजूर अनुदानाच्या दहा टक्के निधी खर्च करण्याची परवानगी आहे; परंतु यापेक्षा जास्त निधीची देयके काढण्यात येत असल्याचे प्रकार उघडकीस आहे. त्यामुळे यापुढे नियमबाह्य औषध खरेदी केल्यास होणाऱ्या नुकसानाला संबंधित संस्था प्रमुख जबाबदार राहणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने स्पष्ट केले आहे.राज्यातील सर्वच वैद्यकीय महाविद्यालय तथा शासकीय रुग्णालयांना अत्यावश्यक बाब म्हणून औषध व सर्जिकल साहित्य खरेदी करायची असल्यास संस्थेला एकूण मंजूर अनुदानाच्या दहा टक्के निधीतून खरेदी करण्याचे अधिकार मर्यादा ठरवून देण्यात आले आहेत.बहुतांश संस्थांमध्ये २०१६ च्या शासन निर्णयानुसार खरेदी धोरणानुसार खरेदीविषयक नियमातील तरतूद राबविण्यात येत नाही. या निर्णयानुसार, हाफकीन जीव औषध महामंडळ (मर्यादित) अंतर्गत खरेदी कक्ष मुंबई या संस्थेने स्वत: उत्पादित केलेल्या औषधांची नावे, पॅकिंग, प्रमाण, संख्या, नियत किंमत इत्यादी दरवर्षी ३१ मार्चपूर्वी ई पोर्टलवर प्रसिद्ध करावी.औषधांच्या खरेदीतील विलंब टाळण्यासाठी संस्था अशा औषधाचा पुरवठा व आदेश प्रक्रिया वेळेवर करूशकत नसेल, तर त्यांची यथोचितपणे नोंद करण्यात येईल, असे नमूद केलेले आहे; परंतु संस्थांकडून याविषयी दक्षता घेण्यात आली नसल्याचे संचालनालयाच्या निदर्शनास आले.

तर वैद्यकीय संस्थांचे देयके निघणार नाहीतज्या संस्थांनी औषधं किंवा सर्जिकल साहित्य खरेदीसाठी दहा टक्के निधीची मर्यादा ओलांडली, अशा संस्थांना कोणत्याही देयकाची रक्कम दिल्या जाणार नसल्याचे वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने पत्राद्वारे स्पष्ट केले आहे. यासंदर्भात वैद्यकीय महाविद्यालयाला संचालनालयाकडून पत्र मिळाल्याची माहिती वैद्यकीय महाविद्यालयातील वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले आहे.

टॅग्स :AkolaअकोलाAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय