शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पुढच्या महिन्यापासून कापूस खरेदी!

By admin | Updated: October 9, 2015 01:57 IST

राज्यात खरीपपूर्व व खरीप हंगामातील कापसाची आवक सुरू ; पणन महासंघाने दिला कापूस खरेदी प्रस्ताव.

राजरत्न सिरसाट /अकोला : राज्यात खरीपपूर्व व खरीप हंगामातील कापसाची आवक सुरू झाली असून, कापूस उत्पादक पणन महासंघाने कापूस खरेदीचा निर्णय घेतला आहे. १५ नोव्हेंबरपासून राज्यातील कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव केंद्र व राज्य सरकारला सादर केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत २0११ पासून कापूस शिल्लक आहे. या संचयित कापसाचा आकडा २0 दशलक्ष टनापर्यंत पोहोचला आहे. यंदा विदेशात कापसाचे उत्पादन घटले आहे आणि आपल्याकडे ४00 लाख कापूस गाठींचे उत्पादन होण्याची शक्यता आहे. भारतीय बाजारपेठेची गरज ३00 लाख गाठींची आहे. भारतीय कापसाचा चायना मोठा आयातदार आहे; त्यामुळे चायना यावर्षी किती कापूस घेतो, याकडे शेतकर्‍यासह तज्ज्ञांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, विदर्भ, मराठवाडा व खान्देशातील कापसाला यावर्षी कमी पावसाचा चांगलाच फटका बसला आहे. असे असले तरी खरीपपूर्व व खरीप हंगामातील कापसाची आवक बाजारात सुरू झाली आहे. यावर्षी हमीभाव ४१00 रुपये प्रतिक्विंटल मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. महाराष्ट्र कापूस उत्पादक सहकारी पणन महासंघ खरेदी केंद्रे केव्हा सुरू करणार याकडे शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे. कापसाची आवक सुरू झाली असल्याने यावर्षी १५ नोव्हेंबरपासून कापूस खरेदी करण्याचा निर्णय घेतला, याकरिता कृषी मंत्रालयाला प्रस्ताव पाठवला असल्याचे महाराष्ट्र सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाचे अध्यक्ष डॉ. एन पी हिराणी यांनी सांगीतले. मागीलवर्षी सीसीआयने केली खरेदी मागील वर्षापर्यंत राष्ट्रीय ग्रामीण कृषी विकास (नाफेड) महासंघाचा अभिकर्ता म्हणून कापूस उत्पादक पणन महासंघ कापसाची खरेदी केली. परंतु केंद्र शासनाने मागीलवर्षी कापूस खरेदीसाठी नाफेडशी करार केला नाही. त्यामुळे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयांतर्गत असलेल्या भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) कापसाची खरेदी केली. त्यामुळे पणन महासंघाला सीसीआयचा अभिकर्ता म्हणून कापूस खरेदी करावा लागला. गेल्यावर्षी राज्यात ११५ कापूस खरेदी केंद्र सुरू केले होते.