शहरं
Join us  
Trending Stories
1
Gautami Patil: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले... (Video)
2
अमेरिकेने दाढी ठेवण्यावर बंदी घातली, शीख सैनिकांमध्ये चिंता; मुस्लिम आणि यहुदींवरही परिणाम
3
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
4
पुतिन यांच्या भेटीआधी भारताला मोठं बळ! S-400 हवाई संरक्षण प्रणालीची एक नवीन खेप येणार
5
कॅश ऑन डिलिव्हरीवर एक्स्ट्रा चार्ज मागितला तर कारवाई होणार, बंपर सेलदरम्यान सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये
6
गुंतवणुकीचा पॅटर्न बदलला: आता लोक बँकांऐवजी शेअर बाजाराकडे वळले? बँकांसाठी मध्यम-दीर्घकाळात आव्हान
7
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
8
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने केली गुपचूप एंगेजमेंट, या दिवशी घेणार सातफेरे
9
Step UP SIP: मुलांचं शिक्षण होऊ शकतं फ्री, तरीही वाचू शकतात ५० लाख रुपये; 'हा' प्लान टेन्शनला करेल बाय-बाय
10
रहस्यमय! ६० विमा पॉलिसी, ३९ कोटी अन् ३ हत्या; आई-बाप आणि पत्नीच्या मृत्यूचा 'त्याने' केला सौदा
11
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
12
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा
13
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
14
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
15
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
16
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
17
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
18
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
19
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
20
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत

बुरखाधारी कापडचोर महिला जेरबंद

By admin | Updated: March 13, 2016 01:56 IST

सिटी कोतवाली पोलिसांची कारवाई, ऑटोचा पाठलाग केल्यानंतर चोरी उघड.

अकोला - शहरातील महागड्या कापड दुकानांमध्ये क ापड खरेदी-विक्रीच्या बहान्याने जाऊन कापड चोरी करणार्‍या तीन बुरखाधारी महिला व त्यांच्या ऑटोचालक साथीदारास शनिवारी अटक करण्यात आली. सीसी कॅमेर्‍याने टिपलेल्या ऑटोरिक्षाच्या क्रमांकावरून सिटी कोतवाली पोलिसांनी ऑटोचा पाठलाग करून चोर महिलांना जेरबंद केले. एका महिला आरोपीच्या घरातून सुमारे ५0 हजार रुपयांचे कापड जप्त करण्यात आले आहेत.पोळा चौकातील रहिवासी फातमा बी सै. नजीर (५५), रशीद बी. शेख दिवान (४२) व शबनम बी. मोहम्मद रफीक या तीन महिला शुक्रवारी सायंकाळी संघवी वाडीसमोर असलेल्या आशीर्वाद साडीज् या शोरुममध्ये साडी खरेदीसाठी गेल्या. साडी खरेदी न करता या महिलांनी साड्यांची पाहणी केली. त्यानंतर काही वेळातच त्या निघून गेल्या. यावेळी तीनही महिलांनी दुकानमालक राजू दयाचंद अग्रवाल व दुकानातील सेल्स गर्लची नजर चुक वून दोन महागड्या साड्या लंपास केल्या. हा प्रकार राजू अग्रवाल यांच्या निदर्शनास आल्यानंतर, त्यांना महिलांवर संशय आला. त्यांनी शोरुममधील सीसी फुटेज तपासले असता, महिलांनी बुरख्यामध्ये साड्या चोरल्याचे स्पष्ट झाले; मात्र बुरख्यामध्ये पूर्ण चेहरा झाकलेला असल्याने त्यांना महिला नेमक्या कोण आहेत, हे दिसले नाही. त्यानंतर त्यांनी दुकानाबाहेर असलेल्या सीसी फुटेजची तपासणी केली असता, तीनही महिला या खैर मोहम्मद प्लॉट येथील रहिवासी अ. आरीफ अ. रफीक याच्या एम एच ३0 पी ९२५९ क्रमांकाच्या ऑटोमध्ये बसताना दिसल्या. यावरून त्यांनी ऑटो क्रमांकासह सीसी फुटेज सीटी कोतवाली पोलिसांना दिले. पोलिसांनी चारही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला असता, या महिला त्याच ऑटोमध्ये बसून अलंकार मार्केटमध्ये जाताना पोलिसांना दिसले. यावरून पोलिसांनी ऑटोचा पाठलाग करून तीनही महिलांसह ऑटोचालकास अटक केली. यामधील फातमा बी सै नजीर हीच्या घराची झडती घेतली असता, तिच्या घरातून सुमारे ५0 हजार रुपयांच्या साड्या, जिन्स पॅन्ट, शर्टसह कापड पोलिसांनी जप्त केले. बुरखाधारी महिलांनी शहरातील अनेक दुकान मालकांना असा गंडा घातला असून, त्यांच्यापासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.