शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात कोरोनाबधित व्यक्तीच्या निवासस्थानी लाखोंची घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 16:43 IST

अज्ञात चोरट्यांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल पळविला असून या चोरीमुळे पोलिसांच्या नाकेबंदी वर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

अकोला : सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बैदपुरा येथील रहिवासी तसेच आर्टिफिशियल फ्लॉवर डेकोरेशन चे काम करणाऱ्या व्यक्तीस मंगळवारी सायंकाळी कोरोना झाल्याच्या निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांना सर्वोपचार रुग्णालयात दाखल करताच त्यांच्या निवासस्थानी मंगळवारी रात्री उशिराच्या सुमारास घरफोडी झाल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. अज्ञात चोरट्यांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल पळविला असून या चोरीमुळे पोलिसांच्या नाकेबंदी वर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.राज्यभरात कोरोना या संसर्गजन्य विषाणूंनी बाधित केलेल्या रुग्णांची संख्या मोठ्या झपाट्याने वाढत आहेत. एक महिन्यापासून सेफ झोनमध्ये असलेल्या अकोला शहरातही कोरोना चा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळला. हा रुग्ण दिल्ली येथून पंधरा दिवसांपूर्वी अकोल्यात परतला होता. फ्लावर डेकोरेशन चे कामकाज करणारे या कुटुंबतील कोरोनाबधित रुग्ण दिल्ली येथून साहित्य घेऊन परतल्यानंतर त्यांना ३ एप्रिल रोजी सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यादरम्यान त्यांना कोरुना संसगार्ची लक्षणे दिसल्याने त्यांच्या स्वबचे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. दरम्यान या नमुन्यांचा अहवाल मंगळवारी सायंकाळी प्राप्त होताच त्यांना कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे जिल्हाधिकारी व आरोग्य विभागाने अकोल्यातील कोरूना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याची जाहीर केले. त्यानंतर बैदपुरा परिसरातील तीन किलोमीटरचा परिसर सील करण्यात आला. तर कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णाच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या घरी कोणीही नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी मंगळवारी रात्री उशिराच्या सुमारास त्यांच्या घरी हैदोस घालत लाखो रुपयांची घरफोडी केली. त्यांच्या घरातील सोन्या-चांदीचे दागिने रोख रक्कम व मुद्देमाल पळविण्यात आला आहे. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने हा परिसर सील केला असून पोलिसांची ही मोठी नाकेबंदी या परिसरात लावण्यात आली आहे. मात्र त्यानंतरही चोरट्यांनी चोरी करून लाखो रुपयांचा मुद्देमाल पलवील्याने आरोग्य विभागाच्या सीलबंद कारवाईवर तसेच पोलिसांच्या बंदोबस्तावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यावरून कोरोणाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतरही आरोग्य विभाग तसेच पोलिस प्रशासन गंभीर नसल्याचे या चोरीच्या घटनेवरून दिसून येत आहे. याप्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आहे. तर सदर कुटुंबीय सर्वोपचार मध्ये दाखल असल्याने त्यांच्या घरी नेमकी किती रुपयांची घरफोडी झाली हे अद्याप समोर आले नाही.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीcorona virusकोरोना वायरस बातम्या