शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

दोन गटांत तुंबळ हाणामारी

By admin | Updated: May 8, 2017 02:48 IST

विवाह समारंभातील वाद: एक जण गंभीर जखमी, दोघांना अटक

अकोला : एकाच समाजातील दोन गटांतील निवडणुकीतील वाद उफाळून आला. यात दोन्ही गटांतील सदस्य समोरासमोर उभे ठाकून हाणामारी झाल्याची घटना शनिवारी रात्री उशिरा सोनटक्के प्लॉटमधील एका विवाह समारंभात घडली. मारहाणीत एका गटाचा सदस्य जखमी झाला. जुने शहर पोलिसांनी दोन्ही गटांतील १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यापैकी दोघांना पोलिसांनी अटक केली. जुने शहरातील सोनटक्के प्लॉटमध्ये आयोजित एका विवाह समारंभामध्ये शनिवारी उशिरा रात्री काही युवकांनी एकमेकांवर कांदे फेकले. यावरून वाद होऊन प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचले. यात अब्दुल जमील ऊर्फ अब्दुल हकीम हा जखमी झाला. त्याला तातडीने सर्वोपचार रुग्णालयात भरती करण्यात आले; परंतु त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. अब्दुल जमील याचा भाऊ अब्दुल सलीम याला पोलिसांनी अटक केली. वादाचे मुख्य कारण कांदे फेकण्याचे नसून, महापालिका निवडणुकीतील वाद असल्याचे बोलले जाते. या वादातूनच काँग्रेसचे अल्लू पहिलवान व भारिप बमसंचे रऊफ पहिलवान यांच्या गटातील सदस्यांमध्ये हाणामारी झाली. फिरोज खान दुल्हे खानच्या तक्रारीनुसार अब्दुल रहमान, शकील, समीर, अब्दुल जमील, अब्दुल सलीम यांच्याविरुद्ध तर अब्दुल समीर याच्या तक्रारीनुसार दुसर्‍या गटातील जाकीर खान, फिरोज खान, दुल्हे खान, नासिर जावेद, वाजिद, मिया खान यांच्याविरुद्ध जुने शहर पोलिसांनी भादंवि कलम १४३, १४७, १४९, ३२४, ५0४ नुसार गुन्हा दाखल केला. रात्री सोनटक्के प्लॉट परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.