शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा, मोताळा होणार वाय-फाय!

By admin | Updated: March 21, 2016 01:41 IST

गुढीपाडव्याला शुभारंभ; सपकाळ यांची अभिनव भेट.

बुलडाणा: एकविसाव्या शतकातील माहिती व दूरसंचार क्रांतीला सामोरे जाताना आजच्या तरुणाईमध्ये प्रचंड आकर्षण असलेल्या इंटरनेट सुविधेचा मोफत लाभ लवकरच बुलडाणा व मोताळा येथील नागरिकांना मिळणार आहे. तळहातावर येऊन ठेपलेला स्मार्ट फोन आज सामाजिक विकासात मोलाचे योगदान देऊ शकतो, या संकल्पनेतून आ. हर्षवर्धन सपकाळ यांच्यावतीने ही मोफत वाय-फाय सुविधा उपलब्ध होणार आहे.आज डिजिटल इंडिया, डिजिटल महाराष्ट्र व ई-माध्यमांच्या चर्चेचा फड सर्वत्र रंगतो; मात्र त्याची खरी ओळख प्रत्यक्ष लाभ मिळाल्यानंतरच कळू शकते. तसे तर मोफत वाय-फाय हे बुलडाणेकरांसाठी स्वप्नवतच! पण हे स्वप्न मराठी नूतन वर्षाच्या अर्थात गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला प्रत्यक्षात उतरणार आहे. आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी बुलडाणा व मोताळा या दोन्ही नगरांमध्ये महत्त्वपूर्ण ठिकाणी मोफत वाय-फाय हॉटस्पॉट उपलब्ध करून दिले आहेत. त्यासाठी भारत संचार निगम लिमिटेड यांच्याशी सामंजस्य करार करण्यात आला असून, महाराष्ट्र शासनाने सदर प्रस्तावास विशेष मान्यता प्रदान केली आहे. बुलडाणा, मोताळा या दोन नगरांबरोबरच बुलडाणा मतदारसंघातील ३९ ग्रामपंचायतींनासुद्धा ब्रॉडबँड इंटरनेट सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. सदर योजना ही तीन वर्षे कालावधीसाठी प्रस्तावित असून त्यासाठी सुमारे ६0 लाख रुपये खर्च अपेक्षीत आहे. यासंदर्भात बोलताना आ. हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ अर्मत्य सेन यांनी दारिद्रय़निर्मूलन व मानव विकास निर्देशांकाच्या वाढीसाठी सामान्य व्यक्ती हा जगाशी जोडला जाणे अपरिहार्य असल्याचे नमूद केले आहे. स्व.राजीव गांधी यांनी आणलेला पीसीओ आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीची मुहूर्तमेढ करणारा ठरला होता. त्यामुळे वाय-फाय सुविधा ही नागरी सुविधेचा एक आवश्यक भाग झाल्यामुळे विकासाच्या संकल्पनेला अनुसरून प्रस्तुत योजनेची अंमलबजावणी होणार असल्याचे आ. सपकाळ यांनी सांगितले.