शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बीटी बियाण्यातील रेफ्युजी तपासणीची धडक मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 15:16 IST

शेतकऱ्यांनी बीटी बियाण्यासोबतचे रेफ्युजी बियाणे पेरलेच पाहिजे, यासाठी कंपन्यांनी पुरवठा केलेल्या बियाण्यांचे नमुने तपासणीची धडक मोहीम कृषी विभागाकडून सुरू आहे.

ठळक मुद्देअळ्यांचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपयुक्त ठरणारी नॉन बीटी रेफ्युजी बियाणे इतरत्र फेकण्यात आले.सिंचनाची सोय असलेल्या भागात कापसाचे पीक मोठ्या प्रमाणात बोंडअळीच्या हल्ल्यात बळी पडले.त्यामुळे चालू वर्षात गुलाबी बोंडअळीचा हल्ला रोखण्यासाठी कृषी विभागाने बियाणे नमुने तपासणीची धडक मोहीम सुरू केली आहे.

अकोला : गेल्यावर्षी बीटी कापूस पिकावर गुलाबी बोंडअळीचा हल्ला झाल्याने शेतकरी पुरता गारद झाला. चालू हंगामात हा प्रकार रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी बीटी बियाण्यासोबतचे रेफ्युजी बियाणे पेरलेच पाहिजे, यासाठी कंपन्यांनी पुरवठा केलेल्या बियाण्यांचे नमुने तपासणीची धडक मोहीम कृषी विभागाकडून सुरू आहे, असे जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी एच.जी. ममदे यांनी सांगितले.बीटी कापूस पिकाला गुलाबी बोंडअळीने पोखरले. त्यातून शेतकºयांचे ९० टक्क्यांपेक्षाही अधिक नुकसान झाले. त्याचा फटका बसलेल्या शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्या. गुलाबी बोंडअळीने कापूस पीक फस्त केल्याच्या जिल्ह्यातील १९३२४ शेतकºयांनी तक्रारी केल्या होत्या. त्यामध्ये २९१०३ हेक्टर क्षेत्रातील पिकाचे नुकसान झाले. त्या तक्रारींची चौकशी तसेच नुकसानाचे सर्वेक्षण करण्यासाठी कृषी विभागाच्या अधिकाºयांनी प्रत्यक्ष परिस्थितीची माहिती घेतली. त्यावेळी गुलाबी बोंडअळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव असलेल्या शेतामध्ये बियाण्याच्या पाकिटासोबत दिल्या जाणाºया रेफ्युजी बियाण्याची पेरणीच शेतकºयांनी केली नसल्याची माहिती पुढे आली. अळ्यांचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपयुक्त ठरणारी नॉन बीटी रेफ्युजी बियाणे इतरत्र फेकण्यात आले. परिणामी, गुलाबी बोंडअळीने थेट कापूस पिकावरच हल्ला केल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले. सिंचनाची सोय असलेल्या भागात कापसाचे पीक मोठ्या प्रमाणात बोंडअळीच्या हल्ल्यात बळी पडले. त्यामुळे चालू वर्षात गुलाबी बोंडअळीचा हल्ला रोखण्यासाठी कृषी विभागाने बियाणे नमुने तपासणीची धडक मोहीम सुरू केली आहे. त्यासाठी बियाण्यांचे नमुने गोळा करून प्रयोगशाळेत तपासणीसाठीही पाठवण्यात आले. त्याचा अहवाल आल्यानंतर बीटी कापूस बियाण्यांत रेफ्युजीचे प्रमाण ठरल्यापेक्षा कमी असल्यास संबंधित कंपन्यांवर कारवाईची शक्यता आहे. तर त्याचवेळी शेतकºयांना बियाण्यांसोबतच्या रेफ्युजीची पेरणी अनिवार्य करण्यात येणार आहे.

- प्रयोगशाळेत पाठवले बियाणे, खतांचे नमुनेजिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने बाजारात विक्रीसाठी असलेल्या विविध बियाण्यांचे १९६ नमुने घेतले आहेत. ते सर्व प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले. त्यामध्ये बीटी कापूस बियाण्यातील रेफ्युजीची तपासणी करण्यासाठी घेतलेल्या नमुन्यांची संख्या मोठी आहे, असे कृषी विकास अधिकारी ममदे यांनी सांगितले. सोबतच खतांमध्ये असलेल्या घटकांचे प्रमाण तपासणीसाठी बाजारातून ४० नमुने घेण्यात आले. ते सर्व प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. त्याचाही अहवाल लवकरच प्राप्त होण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाcottonकापूस