अकोला : येत्या खरीप हंगामात पश्चिम विदर्भातील बीटी कापसाचे क्षेत्र ३0 ते ४0 हजार हेक्टरने घसरण्याची शक्यता असून, कृषी विभागाने उर्वरित क्षेत्रासाठी यंदा ४३ लाख ७५ हजार ८00 बियाणे पाकीटांची व्यवस्था केली आहे. यासोबतच विविध पिकांसाठी जिल्हयांमध्ये बियाण्यांचे नियोजन करण्यात आले आहे.पश्चिम विदर्भात कापसाचे सरासरी क्षेत्र १0,१३,६0८ हेक्टर आहे. या भागातील शेतकरी मुख्यत्वे कापूस उत्पादक आहे. तथापि अलिकडच्या दहा वर्षात कापसाचा उत्पादन खर्च परवडत नसल्याने शेतकर्यांनी कापूस पीक कमी करू न सोयाबीन पेरणीवर भर दिल्याने अलिकडच्या पाच वर्षात पश्चिम विदर्भात कापसापेक्षा सोयाबीनचे क्षेत्र वाढले आहे. येत्या खरीप हंगामासाठी अमरावती,अकोला,बुलडाणा, वाशिम आणि यवतमाळ या पाच जिल्हयासाठी १४ लाख ९२ हजार ९0१ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी केली जाणार असल्याने कृषी विभागाने नियोजन केले आहे., या क्षेत्रासाठी ५,३५,६१७ क्विंटल बियाणे लागणार असल्याने या बियाण्यांची मागणी केली आहे. विदर्भात धान आणि कापूस ही पारंपरिक नगदी पिके आहेत. धान पिकाला अद्याप पर्याय नसल्याने पूर्व विदर्भातील शेतकरी धान शेती करीत आहे. पण पश्चिम विदर्भाला सोयाबीन चा पर्याय सापडल्याने शेतकर्यांनी सोयाबीन पेरणीवर लक्ष केंद्रीत केल्याने कापसाची जागा सोयाबीन घेतली आहे. असे असले तरी पारंपापिक असलेले कापसाचे पीक शेतकरी सोडण्यास तयार नाही, या कापसाला वेगळे अधिष्ठान असून,सीतादही, दिवाळीला कापूसरू पी शेतकर्यांना घरात लक्ष्मी प्रवेश करीत असल्याची अख्यायीका आहे.त्यामुळे या भागात पीक पॅटर्न बदलविण्याचे कृषी विभागाने अनेक प्रयत्न केले तथापि कापसाचे म्हणावे तेवढे क्षेत्र कमी झाले नाही. दरम्यान, येत्या खरीप हंगामासाठी अकोला जिल्हयाला यावर्षी ४ लाख८३ हजार ८७४ पाकीटांची मागणी करण्यात आली असून, सर्वाधिक मागणी ही यवतमाळ जिल्हयसाठी २0 लाख ३0 हजार ३८४ पाकीट आहे. त्या खालोखाल अमरावती जिल्हा ८ लाख ८८ हजार २५ पाकीट बियाणे लागणार आहे. बुलडाण्याला ७ लाख ७५ हजार ३१५ पाकीट लागणार आहेत. तर वाशिम जिल्हयासाठी १ लाख ९८ हजार २0९ पाकीटांची करण्यात आली आहे. दरम्यान यंदा कोणतेच बियाणे कमी पडणार नाही तसे नियोजन करण्यात आले आहे. बिटी कापूस आणि सोयाबीनचे बियाणे मुबलक असल्याचे विभागीय कृषी सहसंचालक एस आर सरदार यांनी स्पष्ट केले आहे.
पश्चिम विदर्भाला लागणार ४३ लाखावर बीटी कापसाची पाकीट !
By admin | Updated: May 4, 2015 01:22 IST