शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

पूर्व वैमनस्यातून बापलेकाची निर्घृण हत्या; अकोला जिल्ह्यातील घटना, दोेघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 09:05 IST

प्रमिला भाेजने यांचा मुलगा अजय याची पत्नी पूजा हिला आरोपी भीमराव भाेजने याचा मुलगा प्रफुल्ल भोजने याने सहा महिन्यांपूर्वी पळवून नेले हाेते. या कारणावरून दोन्ही कुटुंबांमध्ये वैमनस्य होते.

अकोला : तेल्हारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भांबेरी येथे शनिवारी आपसातील वादातून एकाच कुटुंबातील चार जणांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. यामध्ये बापलेकाचा मृत्यू झाला असून, पत्नी व दुसरा मुलगा जखमी झाले आहेत.देवीदास भोजने व अजय भोजने अशी मयत बापलेकांची नावे आहेत, तर प्रमिला भाेजने व विजय भाेजने अशी जखमी मायलेकाची नावे आहेत. मयताची प्रमिला देवीदास भोजने (रा.भांबेरी) यांनी पोलिसांत फिर्याद दिली.प्रमिला भाेजने यांचा मुलगा अजय याची पत्नी पूजा हिला आरोपी भीमराव भाेजने याचा मुलगा प्रफुल्ल भोजने याने सहा महिन्यांपूर्वी पळवून नेले हाेते. या कारणावरून दोन्ही कुटुंबांमध्ये वैमनस्य होते. प्रमिला देवीदास भोजने यांनी आपल्या दीड वर्षाच्या नातीला उद्देशून बोलले असता, घरासमोरून जात असलेल्या आराेपी प्रमिला भीमराव भोजने हिने ते ऐकले. या कारणावरून त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. त्यानंतर काही वेळातच आरोपी प्रमिला भीमराव भोजने, राजेश गणपत भोजने, दर्शन भीमराव भोजने, भीमराव गणपत भोजने या चार जणांनी देवीदास भोजने कुटुंबावर शस्त्रांसह हल्ला केला. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या देवीदास भाेजने यांचा जागेवरच मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा अजय भाेजने हा गंभीर जखमी झाल्याने उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. याच प्राणघातक हल्ल्यात प्रमिला देवीदास भाेजने आणि त्यांचा दुसरा मुलगा विजय देवीदास भाेजने हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी तेल्हारा पाेलीस ठाण्यात आराेपींविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. चारही आराेपींना अटक करण्यात आली आहे. याबाबत तेल्हारा पोलीस अधिक तपास करीत आहेत. या हत्यांमध्ये अन्य  कुणा आरोपींचा सहभाग आहे का, याचाही शोध घेतला जात असल्याचे पोलीस अधिका-यांनी सांगितले.