सिंदखेडराजा (जि. बुलडाणा): सिंदखेडराजा तालुक्यातील तांदूळवाडी येथील एका युवकाने आंब्याच्या झाडाला गफळास लावून आत्महत्या केली. उपरोक्त घटना १४ मे रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. तर ज्या युवकाने आत्महत्या केली त्याच्याच ज्येष्ठ बंधूचा लग्नसोहळा त्याच दिवशी साखरखेर्डा येथे पार पडत होता. साखरखेर्डा पोलीस स्टेशन अंतर्गत तांदूळवाडी येथील समाधान मदन मोरे यांचा विवाह १४ मे रोजी साखरखेर्डा येथील एसईएस हायस्कूलमध्ये पार पडला. लग्न सोहळ्याची संपूर्ण तयारी वरबंधू या नात्याने अनिल सांभाळीत होता. तांदूळवाडी येथून ११ वाजता वरात साखरखेर्डा येथे आली. लग्नाअगोदर गावातून (परण्या) वराची वरात सुरू होती. वरातीत काहीवेळ अनिलही सहभागी होता. काही वेळाने तो वरातीतून सरळ तांदूळवाडी येथे गेला. ङ्म्रीराम शिंदे यांच्या शेतात जावून आंब्याच्या झाडाला दोरफास लावून दुपारी ४ वाजता आत्महत्या केली. तो आत्महत्या करीत असताना समाधानचा विवाह सुरू होता. अनिलच्या आत्महत्येची वार्ता लग्नमंड पात येताच सोहळ्यावर क्षणात विर्जन पडले आणि एकच कल्लोळ माजला. सर्वच वराती तांदूळवाडीला गेले आणि रात्री अनिलवर अं त्यसंस्कार केले. अंबादास श्रीराम बुंधे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी र्मग दाखल केला.
एका भावाची वरात तर दुस-याची अंत्ययात्रा
By admin | Updated: May 16, 2015 01:08 IST