शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

पोलीस अधीक्षक कार्यालयपासून हाकेच्या अंतरावर सुरु होता देहव्यापार अड्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 18:04 IST

अकोला : सिटी कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या देवराव बाबा चाळमध्ये सुरु असलेल्या ...

अकोला: सिटी कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या देवराव बाबा चाळमध्ये सुरु असलेल्या देहव्यापार अड्डयावर स्थानीक गुन्हे शाखा आणि शहर पोलीस उपअधीक्षक यांच्या पथकाने शनिवारी धाड टाकली. या अड्डयावरुन पती-पत्नी, एक ग्राहक आणि पिडीतेस ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुध्द सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.देवराव बाळा चाळमधील एका अपार्टमेंटजवळील घरात दुर्गेश राठोड त्याची पत्नी सुनंदा दुर्गेश राठोड हे दोघे जन देहव्यापार अड्डा चालवीत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांना मिळाली. या माहितीवरुन त्यांनी खात्री पटल्यानंतर शहर पोलीस उपअधीक्षक आणि स्थानीक गुन्हे शाखेला माहिती देउन छापा टाकण्याचे निर्देश दिले. यावरुन सिटी कोतवाली पोलिस, स्थानीक गुन्हे शाखा व शहर पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने संयुक्तरीत्या धाड टाकून दुर्गेश राठोड, त्याची पत्नी सुनंदा राठोड या दोघांसह एका पिडीत महिलेला ताब्यात घेतले. तर यावेळी उपस्थित असलेले ग्राहक रमेश सुर्यभाण चव्हाण रा. आदर्श कॉलनी, दुसरा ग्राहक सुशीलकुमार कमलकीशोर शर्मा रा. कोठारी वाटीका क्रमांक सहा मलकापूर या दोघांनाही अटक केली. या प्रकरणातील देहव्यापार अड्डा चालविणारे पती-पत्नी राठोड, ग्राहक शर्मा आणि चव्हाण या चार जनांना न्यायालयासमोर हजर करण्यात आल्यानंतर त्यांची कारागृहात रवाणगी करण्यात आली आहे. तर पिडीतेची सुटका करण्यात आली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी