शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

आठ कोल्हापुरी बंधा-यांचे पितळ उघडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2017 02:45 IST

समितीची संयुक्त पाहणी; एकाही बंधा-यात पाणी थांबतच नाही.

अकोला, दि. २१- शेतीचे सिंचन वाढवून शेतकर्‍यांना मदत होण्यासाठी लघुपाटबंधारे विभाग स्थानिक स्तरने तयार केलेले बंधारे डोकेदुखीच अधिक ठरले आहेत. प्रत्यक्ष भेटीत पाहणी केलेल्या कोणत्याही बंधार्‍यात पाणी थांबतच नसल्याची नोंद संयुक्त समितीने केली आहे. कोल्हापुरी बंधार्‍यांची सद्यस्थिती तपासून जिल्हा परिषदेकडे हस्तांतरणासाठी संयुक्त समितीचा दौरा मंगळवारपासून सुरू झाला. यावेळी आठ बंधार्‍यांची पाहणी करण्यात आली. ह्यलोकमतह्णने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर समितीकडून ही तपासणी होत आहे.गेल्या काही वर्षात १00 हेक्टरपेक्षा कमी सिंचन क्षमता असलेल्या कोल्हापुरी बंधार्‍यांची कामे जिल्हा परिषदेने लघू पाटबंधारे विभाग स्थानिक स्तर यांच्याकडे दिली. त्या ८४ पैकी केवळ १४ बंधारे जिल्हा परिषदेला हस्तांतरित करण्यात आली. उर्वरित कामे हस्तांतरित करून घेण्यासाठी जिल्हा परिषदेने पाठपुरावा केला; मात्र त्याचा कुठलाही परिणाम झाला नाही. याबाबत ह्यलोकमतह्णने वृत्त लावून धरले. त्या बंधार्‍यांची तपासणी करण्यासाठी चार महिन्यांपर्यंत स्थानिक स्तरकडून माहितीच मिळाली नाही. बंधार्‍याचे सुरुवातीचे अंदाजपत्रक, त्यामध्ये झालेली वाढ, वाढीव निधीतून केलेले काम, त्यातून किती सिंचन वाढले, शेतकर्‍यांना कोणता लाभ झाला, या मुद्यांची माहिती मागवण्यात आली. ती देण्यासही उशीर झाला. त्यामुळे संयुक्त समितीचा दौरा सातत्याने पुढे ढकलला.सहा गावांतील आठ बंधा-यांची पाहणीसंयुक्त समितीने हिंगणा-शेळद, धाडी-बल्हाडी-२, तांदळी, चिंचोली गणू, मळसूर, चान्नी या गावातील आठ कोल्हापुरी बंधार्‍यांची स्थळावर पाहणी केली. त्यामध्ये सिंचनापासून शेतकर्‍यांना वंचित ठेवण्याला जबाबदार असलेल्या त्रुटी मोठय़ा प्रमाणात आढळल्या. दौर्‍यामध्ये जिल्हा परिषद सदस्य गोपाल कोल्हे यांच्यासह लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता ए.व्ही. देशमुख, स्थानिक स्तरचे कार्यकारी अभियंता श्याम बोके, लघुसिंचनचे उपअभियंता पी.डब्ल्यू.तायडे, शाखा अभियंता आर.जे.गिरी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.बंधार्‍यांचे गेट गायब, स्लॅबही नाहीसमितीने भेट दिलेल्या सर्वच बंधार्‍यांमध्ये पाणी थांबतच नाही. त्याला वेगवेगळी कारणे आहेत. त्यामध्ये बंधार्‍यांत टाकण्यासाठी असलेले गेटच नादुरुस्त आहेत. काही ठिकाणी तर जाग्यावर ते उपलब्धही नाहीत. चान्नी बंधार्‍याला २४ गेट असताना केवळ १५ च आहेत.  गेटबाबत विचारणा केली असता, शेड मधे असल्याचे सांगण्यात आले; मात्र चावी नसल्याचे कारणही देण्यात आले. तांदळी येथे दुरुस्तीसाठी दहा लाख मिळाल्यानंतरही दुरुस्ती झाली नसल्याचे ग्रामस्थांनी समितीला सांगितले.