शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

उज्ज्वलाच्या लाभार्थींंच्या माहितीचा अंधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 01:03 IST

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून ग्रामीण  भागातील कुटुंबांना गॅस पुरवठा देण्याची योजना कंपन्या  आणि वितरकांच्या मनमानीमुळे प्रचंड त्रासाची ठरत आहे.  विशेष म्हणजे, योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी  प्रशासकीय स्तरावर कुठलीच माहिती उपलब्ध नसल्याने  समन्वयासाठी नेमलेल्या पुरवठा विभागाला कंपन्या, वि तरकांकडून कोणताच प्रतिसाद मिळत नाही. परिणामी,  हजारो लाभार्थींंना एजन्सीधारकांकडे केवळ चकरा  मारण्याची वेळ आली आहे. अकोला शहरातील राजेश्‍वर  गॅस एजन्सीमध्ये हा प्रकार गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू  आहे.

ठळक मुद्देगॅस कंपन्या, वितरकांकडून प्रचंड त्रासराजेश्‍वर एजन्सी संचालकाचा उद्दामपणासमन्वयक सक्सेना यांच्याकडे दुसर्‍यांदा तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून ग्रामीण  भागातील कुटुंबांना गॅस पुरवठा देण्याची योजना कंपन्या  आणि वितरकांच्या मनमानीमुळे प्रचंड त्रासाची ठरत आहे.  विशेष म्हणजे, योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी  प्रशासकीय स्तरावर कुठलीच माहिती उपलब्ध नसल्याने  समन्वयासाठी नेमलेल्या पुरवठा विभागाला कंपन्या, वि तरकांकडून कोणताच प्रतिसाद मिळत नाही. परिणामी,  हजारो लाभार्थींंना एजन्सीधारकांकडे केवळ चकरा  मारण्याची वेळ आली आहे. अकोला शहरातील राजेश्‍वर  गॅस एजन्सीमध्ये हा प्रकार गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू  आहे.अशुद्ध इंधनावर केलेल्या स्वयंपाकातून होणारे मृत्यू टाळणे,  प्रदूषण कमी करणे, या उद्देशाने केंद्र शासनाने प्रधानमंत्री  उज्ज्वला गॅस पुरवठा योजना सुरू केली. २0११ च्या  जनगणनेनुसार गरीब कुटुंबांना योजनेचा लाभ दिला जातो.  त्या कुटुंबांना १६00 रुपये मदत देण्याचीही तरतूद त्यामध्ये  आहे. जनगणना यादीत नाव असलेल्या गरीब कुटुंबांना पुरवठा  देण्याची जबाबदारी तीनही गॅस कंपन्यांना देण्यात आली. कं पन्यांनी सर्व वितरकांना लाभार्थींंचे अर्ज घेऊन पुरवठा  देण्याचे बजावले; मात्र योजनेत पात्र असलेल्या लाभार्थींंंची  यादी कोठे आहे, याची माहिती ग्रामपंचायत स्तरावर आहे.  त्यापैकी किती लोकांनी कोणाकडे अर्ज सादर केले, याची  एकत्रित माहिती संबंधित कंपन्यांकडे आहे. त्या कंपन्यांनी  वितरकांकडे यादी दिली. ती यादी योजनेवर लक्ष ठेवणारी  यंत्रणा म्हणून पुरवठा विभागाकडे अद्यापही दिलेली नाही. तसेच योजनेचा लाभ दिला जातो की नाही, याबाबतचा पाठ पुरावा करण्यासाठी कंपन्यांनी विभागीय मार्केटिंग  अधिकार्‍यांना जबाबदारी दिली; मात्र सर्वसामान्य लाभार्थी  त्यांच्याशी कधी संपर्क करणार, तक्रार जिल्हा पुरवठा  अधिकार्‍यांकडे कधी करणार, या घोळात गेल्या अनेक  महिन्यांपासून जिल्हय़ातील हजारो लाभार्थींंना चकरा  मारण्याची वेळ एजन्सीधारकांनी आणली आहे. त्यामुळे  प्रधानमंत्र्यांच्या नावे असलेल्या योजनेबद्दल लाभ नको, वि तरकांना आवरा, असेच म्हणण्याची वेळ लाभार्थींंंवर आली  आहे.