शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्याच पावसात चार महिन्यांपूर्वी निर्मित पूल उखडला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 15:52 IST

निष्कृष्ट बांधकाम केल्यामुळे हा पूल पहिल्याच पावसात खरडून गेला.

लोकमत न्यूज नेटवर्कनिहिदा : दोनद खुर्द येथील चार महिन्यांपूर्वी बांधकाम करण्यात आलेल्या पूल पहिल्याच मुसळधार पावसामुळे उखडून गेला आहे. त्यामुळे पुलाच्या निकृष्ट बांधकामाचे पितळ उघडे पडले आहे. यासोबतच परिसरात शेतातील पिकांचे नुकसान झाले असून, अनेकांची शेतजमीन खरडून गेली आहे.मुसळधार पावसामुळे पूल तर वाहून गेला; परंतु पुलाची उंची न वाढविल्यामुळे पाण्याचा निचरा झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची शेती खरडून गेली असून, पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. परिसरातील ऊर्मिला देवानंद लाखे, नीलेश कावरे, पंकज टिंगरे, राजू पाटील काकड, दीपक तिवले, सुभाष जामनिक, मनोहर महल्ले, संजय टिकार, यासह अनेक शेतकऱ्यांचे पुलामुळे मोठे नुकसान झाले आहे. या रस्त्याचे बांधकाम हायब्रीड एन्यूईटी कंपनी करीत असली तरी देखरेखीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून झाले आहे.पुलाचे बांधकाम सुरू असताना, येथील शेतकºयांनी सामाजिक कार्यकर्ते सचिन पाटील महल्ले यांच्या नेतृत्वात कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देऊन पुलाची उंची वाढविण्याची मागणी केली होती; परंतु त्याची अधिकाºयांनी दखल घेतली नाही. पुलाची उंची वाढविली असती तर शेतकºयांची शेतजमीन व पिके खरडून गेली नसती. शेतकºयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या संदर्भात केंद्रीय मंत्री अ‍ॅड. संजय धोत्रे यांच्याकडेही शेतकºयांनी तक्रार केली होती. तक्रारीनुसार धोत्रे यांनी कार्यकारी अभियंत्यांना पत्र देऊन पुलाची उंची वाढविण्याचे निर्देश दिले होते. परंतु त्याकडेही अधिकाºयाने कानाडोळा केला. निष्कृष्ट बांधकाम केल्यामुळे हा पूल पहिल्याच पावसात खरडून गेला. त्यामुळे संबंधित कंत्राटदाराची चौकशी करावी आणि नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करून शेतकºयांना नुकसान भरपाई द्यावी आणि पुलाची उंची वाढवून नवीन पुलाचे बांधकाम करावे, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.दोनद येथील पुलामुळे शेतकºयांची शेती खरडून गेली. शेती नुकसानबाबत पंचनामे करून शेतकºयांच्या मदतीसाठी प्रयत्न करू. उखडलेला पुलाची दुरुस्ती करण्यात येईल.- उमेश वानखडे, उपअभियंता सा.बां. विभाग, मूर्तिजापूर

टॅग्स :Akolaअकोलाpwdसार्वजनिक बांधकाम विभाग