शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

नवरी गेली नवरदेवाच्या दुचाकीवरून सासरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 18:23 IST

विवाहानंतर नवरी नवरदेवाच्या दुचाकीवर बसून सासरी रवाना झाली. (

मूर्तिजापूर : दीड महिन्यांपूर्वी साखरपुडा झाला. १५ एप्रिल रोजी विवाह ठरला; परंतु अचानक कोरोना विषाणूचे संकट आल्याने संचारबंदी लागू करण्यात आली; परंतु विवाह टाळण्याची दोन्ही पक्षाकडील मानसिकता नव्हती, त्यामुळे १५ एप्रिल रोजी नवरा मुलगा वधू मंडपी हजर झाला आणि ठरल्याप्रमाणे सकाळी ८ वाजता महसूल कर्मचारी व पाच नातेवाईक यांच्या उपस्थित विवाह पार पडला. महत्त्वाचे म्हणजे नवरी मुलगी विवाहानंतर थेट नवरदेवाच्या दुचाकीवरून सासरी गेली.तालुक्यातील गाजीपूर येथील दिलीप फत्तुजी तायडे यांची मुलगी अंकिताचा विवाह, दर्यापूर तालुक्यातील कळशी येथील किसनराव मोटरजी तायडे यांचा मुलगा अंकुश याच्याशी दीड महिन्यापूर्वीच ठरला. १५ एप्रिल विवाहाची तारीख निश्चित करण्यात आली; परंतु जमावबंदी असल्याने सगळे रितीरिवाज बाजूला ठेवून अगदी साध्या पद्धतीने पाच लोकांच्या उपस्थितीत गाजीपूर येथे विवाह संपन्न झाला. विवाहासाठी नवरा चक्क दोन दुचाकीवरून आपल्या काका व चुलत भावाला घेऊन वधू मंडपी दाखल झाला. तर वधू पक्षाकडून आई, वडील व भाऊ उपस्थित होते. तहसीलदार प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या विवाहासाठी पटवारी संदीप बोळे, सरपंच स्वप्निल तवर, पोलीस पाटील विजय भवाने, कोतवाल सुनील तायडे ही वºहाडी मंडळी उपस्थित होती. यावेळी नववधू अंकिता हिला महसूल विभागाकडून एक सॅनिटायझर बाटली व पाचशे रुपये व सरपंच स्वप्निल तवर यांनी पाचशे रुपये खाऊ दिला. विवाहानंतर नवरी नवरदेवाच्या दुचाकीवर बसून सासरी रवाना झाली. (शहर प्रतिनिधी) 

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूर