अकोला: लाच स्वीकारणारे आकोट पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भाऊराव लांभाटे यांना बुधवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना कारागृहात पाठविण्याचे आदेश दिले. शिक्षक पतसंस्थेतून कर्ज मिळण्यासाठी शिक्षकाने गटविकास अधिकारी लांभाटे यांना शिफारसपत्र देण्याची मागणी केली होती. या पत्रासाठी लांभाटे यांनी ५ हजार रुपये लाचेची मागणी केली. दोघांमध्ये तडजोड होऊन १ हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानंतर शिक्षकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे गटविकास अधिकार्याची तक्रार केली. पैसे देण्याचा दिवस ठरल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक उत्तमराव जाधव यांच्या मार्गदर्शनात अधिकारी व कर्मचार्यांनी लांभाटे यांच्या शासकीय निवासस्थानाजवळ सापळा लावला आणि त्यांना लाच घेताना अटक केली.
लाचखोर बीडीओची कारागृहात रवानगी
By admin | Updated: June 5, 2014 01:32 IST