अकोला: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अहवालानुसार अखेर आकोट पंचायत समितीचे लाचखोर विस्तार अधिकारी एस.एस. लो थे यांना निलंबित करण्यात येत असल्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अरुण उन्हाळे यांनी बुधवारी दिला.कुटुंब नवृत्ती वेतनाच्या प्रस्तावासाठी ना देय प्रमाणपत्र देण्यासाठी आकोट पंचायत समितीचे विस्तार अधिकार्यांनी दोन हजार रुपयांची मागणी केली होती. वडाळी सटवाई उपसरपंच शोएबोद्दीन सौफीद्दीनमार्फत त्यांनी ही रक्कम स्वीकारली होती. या प्रकरणात लोथे व शोएबोद्दीन सौफोद्दीन या दोघांना गेल्या ४ सप्टेंबर रोजी लाचलुच पत प्रतिबंधक विभागाने अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
लाचखोर विस्तार अधिकारी निलंबितं
By admin | Updated: September 18, 2014 02:25 IST