शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर ‘एएसआय’ गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 01:25 IST

अकोला : बाळापूर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या एका एएसआयला १ हजार ५00 रुपयांची लाच घेताना अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने शुक्रवारी बाळापूर पोलीस ठाण्यातून रंगेहात अटक केली. संजय रामेश्‍वर पारसकर असे लाचखोर एएसआयचे नाव असून, त्याला शनिवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देअधिकार्‍यांची चौकशी होण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : बाळापूर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या एका एएसआयला १ हजार ५00 रुपयांची लाच घेताना अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने शुक्रवारी बाळापूर पोलीस ठाण्यातून रंगेहात अटक केली. संजय रामेश्‍वर पारसकर असे लाचखोर एएसआयचे नाव असून, त्याला शनिवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.बाळापूरमधील रहिवासी तसेच खासगी इलेक्ट्रिशियनविरुद्ध झालेल्या तक्रारीनंतर दखलपात्र गुन्हा दाखल न करता अदखलपात्र गुन्हा दाखल करणे आणि अटक टाळण्यासाठी बाळापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या संजय रामेश्‍वर पारसकर या एएसआयने एक हजार ५00 रुपयांची लाच मागितली होती; मात्र सदर व्यक्तीला लाच देणे नसल्याने त्यांनी या प्रकरणाची तक्रार अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे केली. यावरून अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून पडताळणी केली असता एएसआय पारसकर याने लाच मागितल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर सदर लाचेची रक्कम घेऊन शुक्रवारी ठाण्यात बोलावल्यानंतर सापळा रचून असलेल्या अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी एएसआय संजय पारसकर याला तक्रारकर्त्याकडून १ हजार ५00 रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली. ही कारवाई अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे प्रमुख संजय गोर्ले यांच्या मार्गदर्शनात मंगेश मोहोड, सुनील राऊत, ज्ञानेश्‍वर सैरीसे यांनी केली.

अधिकार्‍यांची चौकशी होण्याची शक्यतासदर लाच प्रकरणात पोलीस अधिकार्‍यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. एएसआय पारसकर याने लाच स्वीकारल्यानंतर यामध्ये आणखी कुणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेण्यात येणार असून, वरिष्ठ अधिकार्‍यांची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती आहे.